आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काँग्रेस-राष्ट्रवादी भांडत राहिले तर ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील', माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे : चांगला बंगला, खाते यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भांडू नये. मंत्री नीट न वागल्यास उद्धव ठाकरे केव्हाही सत्तेतून बाहेर पडतील आणि ग्रामीण भागाकरिता काम करणारे सरकार राहणार नाही, असा इशारा माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला. मंत्री शंकरराव गडाख व जि. प. अध्यक्ष राजश्री घुले यांचा सत्कार रविवारी ज्ञानेश्वर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे करण्यात आला त्या वेळी गडाख बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा धाडसी निर्णय घेतला म्हणून आजचा सुवर्ण दिन दिसत आहे. मात्र मंत्री नीट न वागल्यास आणि शारीरिक-मानसिक स्वास्थ्य न लाभल्यास उद्धव सत्तेतून बाहेर पडतील. त्यामुळे भांडू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

आता पाेलिस त्रास देणार नाहीत : शंकरराव गडाख

पाटपाण्याच्या आवर्तनात यापुढे खात्याचे कर्मचारी, पोलिस शेतकऱ्यांना त्रास देणार नाहीत. धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून किमान दोन वर्षे पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. , असे मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...