आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या कानात दोन दिवसांपासून खाजवत होते; डॉक्टरांना वाटला किडा असेल, पण निघाली जिवंत पाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक- थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एका डॉक्टराने रूग्णाल्या कानातून जिवंत पाल काढली. महिलेच्या कानात दोन दिवसांपासून खाजवत होते आणि त्रास होत होता. मंगळवारी ती राजाविथी हॉस्पीटलमध्ये पोहचली आणि डॉक्टरांना दाखवले.

 

अँटीबायोटिक ड्रॉप्सनेही बाहेर आली नाही पाल
डॉक्टर वरन्या नगांथावीने कान पाहण्यासाठी ऑटोस्कोपचा वापर केला. त्यांना महिलेच्या कानात किडा फिरत असल्याचे दिसले. त्यांनी काही अँटीबायोटिक ड्रॉप्स महिलेच्या कानात टाकून किड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो बाहेर आलाच नाही. त्यानंतर त्यांनी चिमट्याच्या साहाय्याने त्या किड्याला बाहेर काढले. त्याला बाहेर काढताच डॉक्टर आणि नर्स हैरान झाले. ते ज्याला किडा समजत होते, तो किडा नसून पाल निघाली.

 

फेसबूकवरुन लोकांना सांगितले
फेसबूक पोस्ट शेअर करून डॉ. वरन्याने या घटनेची माहिती दिली. त्यांनी लिहीले- "पाल जिवंत होती. ती कानात फिरत होती. त्यामुळे रुग्णाच्या कानात दुखत होते. थायलंडमध्ये या पालीला जिंग जोक म्हणतात. ती रुग्णाच्या कानात कशी गेली, ते माहीत नाही. सध्या रुग्ण डॉक्टरांच्या नजरेत आहे."