आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Thai Judge Khanakorn Pianchana Attempts Suicide In Courtroom For Protest Over Interference

दबावाखाली येऊन न्यायाधीशांना द्यावा लागला मनाविरुद्ध निर्णय, कोर्टरुममध्येच स्वतःवर झाडली गोळी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्महत्येचा प्रयत्न करणारे न्यायाधीश खानाकोर्न पियांचना - Divya Marathi
आत्महत्येचा प्रयत्न करणारे न्यायाधीश खानाकोर्न पियांचना

बँकॉक- थायलंडच्या याला प्रांतात न्यायाधीस खानाकोर्न पियांचना यांनी शुक्रवारी कोर्टरूममध्येच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी लिहीलेले 25 पेजचे नोट सापडले आहे. हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यात लिहीले आहे की, "निष्पक्ष निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य नव्हते. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या निर्णयात फेरबदल करत होते. दबावात येऊन त्यांना हा निर्णय द्वावा लागत आहे." स्वतःवर गोळी झाडल्यानंतर तत्काळ त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्या न्यायाधीशांचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
 
पियांचना बँकॉकमधील याला प्रांतातील एक न्यायालयात न्यायाधीश आहेत. शुक्रवारी न्यायालयात 5 आरोपींना कोण्या एका प्रकरणातून निर्दोष सोडण्यात आले. या दरम्यान पियांचना यांनी स्वतःच्या छातीत गोळी झाडली. त्यांनंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 
पियांचना यांनी सांगितल्यानुसार, ज्या 5 आरोपींना कोर्टाने मुक्त केले, त्यापैकी तिघांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकत होती. सोशल मीडियावरुन दावा केला जात आहे की, पियांचना यांच्या फेसबूक अकाउंटवर 25 पानांची नोट आणि एक व्हिडिओदेखील शेअर करण्यात आला आहे. ज्यात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप लावले आहेत.
दुसरीकडे, न्यायालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पियांचना यांनी वयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली आहे. तर काही लोक पियांचना यांचे आरोप खरे असल्याचे मानतात. थायलंडमध्ये असे नेहमी होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्णय बदलायला सांगतात किंवा ते स्वतः बदलतात.

पुरावा नाही तर शिक्षादेखील नाही
 
पियांचना म्हणाले की, "हे समजायला हवं की, एखाद्याविरुद्ध पुरावे नसतील, तर त्याला शिक्षा होऊ शकत नाही. जर एखाद्या विरुद्ध पुरावे असतील, तरच शिक्षा होते. मी हे म्हणत नाहीये की, त्या पाच आरोपींनी गुन्हा केला नाही. निर्णय प्रक्रीया पारदर्शक असयला हवी."