आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बँकॉक - थायलंडच्या राजकुमारी उबोलरत्न यांनी शाही परंपरा मोडीत काढून पंतप्रधान पदासाठी मार्चमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत उतरणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय झाला आहे.
थायलंडचे राजा भूमीबोल अतुल्यतेज यांची मुलगी व विद्यमान राजा महा वजिरलोंग्कोर्न यांची मोठी मुलगी ६७ वर्षीय राजकुमारी उबोलरत्न यांना थाई राक्सा चार्ट पार्टीकडून (टीआरसीपी) पंतप्रधान पदासाठी उमेदवारी मिळाली आहे. या घोषणेमुळे थायलंडच्या राजेशाही कुटुंबात नवा इतिहास लिहिण्यात आला आहे. थायलंडमध्ये पहिल्यांदाच शाही परिवारातील एखादा सदस्य लोकशाहीतील पदासाठी निवडणूक लढवणार आहे.
२०१४ मध्ये सत्ता काबीज करणारे लष्कर प्रमुखही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. माजी पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा, त्यांची धाकटी बहिण थकसिन शिनवात्रा हे अजूनही विजनवासात आहेत. मात्र थायलंडच्या राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून त्यांचा दबदबा आजही कायम दिसतो.
२४ मार्च रोजी मतदान : थायलंडमध्ये २४ मार्च रोजी पंतप्रधान पदाची निवडणूक होणार आहे. संसदेतील ५०० निर्वाचित व लोकप्रतिनिधी सभागृहातील २५० सिनेटर संयुक्तरित्या पंतप्रधान पदासाठी मतदान करतात. त्यात नवीन पंतप्रधानांची निवड केली जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.