आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे व मुंबई महापौर अॅक्सिस बँक खाती वळवणार, महापालिकेचा मोठा निर्णय

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर समाज माध्यमांवर टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे़. ट्विटरवरचा हा वाद प्रत्यक्षात कारवाईवर आला आहे. मुंबई आणि ठाणे या शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकांनी आपल्या लाखो कर्मचाऱ्यांची खाती अमृता कार्यरत असलेल्या अॅक्सिस बँकेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे.  अमृता यांच्या टीकेनंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिस दलाची खाती अॅक्सिस बँकेतून वळवल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची खाती एसबीआयमध्ये वळविण्याचा आम्ही विचार करत अाहोत, असे  मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.   ठाणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेत खाती आहेत. आता या बँकेतील खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत उच्च पदावर आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी सेनेने हे धक्कातंत्र अवलंबल्याचे सांगितले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...