आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पे टीएमचे केवायसी अपडेट करा म्हणत मागितले आधार, पॅन कार्ड डीटेल; 5 लाख रुपये लुटले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पे-टीएमने वेळोवेळी आपल्या ग्राहकांना अशा फसणूक करणाऱ्यांपासून सावध केले आहे. - Divya Marathi
पे-टीएमने वेळोवेळी आपल्या ग्राहकांना अशा फसणूक करणाऱ्यांपासून सावध केले आहे.

मुंबई - मोबाइल पेमेंट अॅप पे-टीएमचा कर्मचारी असल्याचा बनाव करून एका आरोपीने 5 लाख रुपये लुटल्याची घटना गुरुवारी ठाणे येथे समोर आली आहे. पोलिसांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना बुधवारी यासंदर्भातील तक्रार मिळाली होती. पीडित व्यक्तीला पे-टीएमचा कर्मचारी असल्याचे बनाव करून एका व्यक्तीने केवायसी अपडेट करा असे सांगितले. एक अॅप डाउनलोड करायला लावून 10 रुपये घेतले. यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड माहिती घेतली आणि सलग दोन दिवस एकानंतर एक अकाउंट डिडक्शनचे मेसेज सुरू झाले. पोलिसांत तक्रार दिली तेव्हा पीडित व्यक्तीला आणखी एक धक्का बसला.

अॅप डाउन करायला लावून 10 रुपये घेतले, मग...

  • सुखदा नारकर नावाच्या व्यक्तीला काही 29 डिसेंबर रोजी एका निनावी नंबरने फोन आला होता. त्या व्यक्तीने आपण पे-टीएमचा कर्मचारी बोलतोय कृपया आपला केवायसी (Know Your Customer) अपडेट करा असे सांगितले. सुखदा तयार झाल्या आणि त्याने सांगितल्याप्रमाणे अनोळखी व्यक्तीला आपला आधार क्रमांक आणि पॅन कार्डचे डीटेल्स पाठवले. यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना क्विक सपोर्ट (Quick Support) नावाचे अॅप डाउनलोड करायला लावले. आपले डीटेल्स कन्फर्म करण्यासाठी आता 10 रुपयांची पेमेंट करा असे सांगितले. सुखदा यांनी एकानंतर एक आरोपीने दिलेल्या प्रत्येक निर्देशाचे पालन केले.
  • 10 रुपयांची पेमेंट झाल्यानंतर फोन ठेवला आणि काही मिनिटांतच आणखी एक मेसेज आला. त्यानुसार, सुखदा यांच्या खात्यातून आणखी रक्कम कमी झाली होती. यानंतर सलग दोन दिवस कधी 9,999 तर कधी 4,999 आणि 2,999 अशी रक्कम कापण्यात आल्याचे मेसेज सुरूच होते. तब्बल 1 लाख 20 हजार रुपये कापल्यानंतर अखेर सुखदा यांनी बुधवारी पोलिस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी पोहोचल्या तेव्हा आपल्यासारखेच आणखी 4 जण अशीच तक्रार घेऊन उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने अशाच पद्धतीने 6 जणांकडून एकूणच 5 लाख 4 हजार रुपये लुटले आहेत. या प्रकरणी निनावी व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.