ठाणे शहर विकास / ठाणे शहर विकास विभागाचे काम होणार इंटरनेटवरून

May 24,2011 05:57:55 PM IST

ठाणे - महापालिकेच्या शहर विकास विभागाचे (टाऊन प्लॅनिंग) काम पारदर्शक केले जाणार असून, आता वास्तुविशारद व विकसकांना वेबसाईटवरून प्रस्ताव सादर करता येणार आहेत. विशेष म्हणजे वेबसाईटवर नागरिकांना महापालिकेने मंजूर केलेल्या इमारती व संकुलांची माहिती उपलब्ध होणार आहे.पालिकेच्या महासभेत आयुक्त आर. ए. राजीव यांनी ही माहिती दिली. tmctp.com असे वेबसाईटचे नाव असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते महिनाभरात तिचे उद्‌घाटन केले जाणार आहे.X