'ठाणे जिल्हा विभाजनाबाबत / 'ठाणे जिल्हा विभाजनाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार'

May 24,2011 05:41:47 PM IST

अंबरनाथ - ठाणे जिल्हा विभाजन आणि अंबरनाथ पालिकेतील युतीच्या काळात झालेला भ्रष्टाचार या प्रश्‍नासंदर्भात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा कॉंग्रेस लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय दत्त यांनी जाहीर केले.

ठाणे जिल्हा (ग्रामीण) कॉंग्रेस तसेच अंबरनाथ ब्लॉक कॉंग्रेस यांच्या वतीने सामाजिक समरसता वर्षानिमित्त संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन बुवापाडा येथे करण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस ऍड. महादेव शेलार, जिल्हा निरीक्षक राजन भोसले, युवक अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा सेवा दल संघटक विजयन नायर, जिल्हा महिला अध्यक्षा संघजा मेश्राम,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी उपस्थित होते.X