आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला धडा शिकवताना इतकी क्रूर बनली आई, चिमुकल्याला रोज अमानुष यातना देऊन पाठवते व्हिडिओ; म्हणते, लवकर पैसे पाठव...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण करत यातना देत असल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये दिसणारी ही महिला त्या मुलाची आई आहे. तसेच तिने हा अत्याचार पतीला कथिरित्या धडा शिकवण्यासाठी केला. व्हिडिओ देखील महिलेने स्वतः बनवला आणि तिनेच तो आपल्या पतीला देखील पाठवला आहे. तिने अशा स्वरुपाचा व्हिडिओ बनवून पतीला पाठवण्याची पहिली वेळ नाही.


सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ 28 फेब्रुवारीचा आहे. महिलेचे नाव हिना शेख आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी तिचा पतीसोबत घटस्फोट झाला होता. त्या मुलाच्या पालन पोषणासाठी पती फयाज दरमहा 6 हजार रुपये पाठवत असतो. परंतु, एखाद्या महिन्यात पैसे पाठवण्यास विलंब झाला की हिना अशाच स्वरुपाचे व्हिडिओ तयार करून पतीला लवकरात लवकर पैसे पाठवण्यास सांगते. व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकायला आणि पाहायला मिळते, की ती महिला चिमुकल्याला विचारते, तुझ्या बापाकडे जाशील? यावर तो चिमुकला किंचाळून नाही असे म्हणतो. तरीही हिना त्या मुलाला बेदम मारहाण करत असते. यानंतर एका ठिकाणी हिना म्हणते, की तुझा बाप दरमहा फक्त 6 हजार रुपये पाठवतो आणि तू 10 हजार खातो." हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित महिलेला अटक झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...