आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात तांत्रिक बिघाड, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे ‍थोडक्यात बचावले शिवसेनेचे नगरसेवक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे गुरुवारी (ता.10) ठाण्याच्या शिवसेना नगरसेवकांसह 40 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. उड्डाण घेतल्यानंतर 30 मिनिटांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाच्या निदर्शनास आले. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने फिरवले आणि मुंबई विमानतळावर विमानाचे इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सगळे प्रवाशी सुखरूप विमानातून बाहेर उतरले.

 

मिळालेली माहिती अशी की, ठाण्याचे शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी असे एकूण 40 जण 'गो एअर' कंपनीच्या विमानाने दिल्लीला निघाले होते. दिल्लीचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी नगरसेवक राजधानीला निघाले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर जवळपास 30 मिनिटांत विमानात तांत्रिक ब‍िघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. वैमानिकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण न करता कंट्रोल रुमशी संपर्क साधत विमान माघारी फिरण्याचा निर्णय घेतला होता. हा सगळा प्रकार पाहून प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विमानाचे लॅंडिंग केल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. नंतर दुसऱ्या विमानातून नगरसेवक दिल्लीला रवाना झाले.

 

बातम्या आणखी आहेत...