आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबूक लाइव्ह करत म्हणाला मी आत्महत्या करतोय, दुस-याच क्षणी उचलले टोकाचे पाउल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी त्याने स्वतःला श्रद्धांजली वाहतानाचा एक फोटो तयार करून करून फेसबूकवर पोस्ट केला होता. - Divya Marathi
रविवारी त्याने स्वतःला श्रद्धांजली वाहतानाचा एक फोटो तयार करून करून फेसबूकवर पोस्ट केला होता.

ठाणे - येथील एका सरकारी कर्मचाऱ्याने फेसबूकवर लाइव्ह माहिती देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय व्यक्तीचे नाव मंदार भोइर असे होते. तसेच तो पाणीपुरवठा विभागात कार्यरत होता. त्याने आपल्या चराई येथील राहत्या घरी सोमवारीच आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी मंदारने फेसबूकवर एक बॅनर लावले होते. त्यानंतर फेसबूक लाइव्ह सुद्धा केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार ठाणे महापालिकेत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्यासोबत एकुलत्या एक मुलाला देखील घेऊन गेली. तेव्हापासूनच मंदार घरात एकटा राहत होता. त्याने आपल्या मित्रांशीच नव्हे, तर कार्यालयाशी सुद्धा संपर्क तोडले होते. याच दरम्यान, रविवारी त्याने स्वतःला श्रद्धांजली वाहतानाचा एक फोटो तयार करून करून फेसबूकवर पोस्ट केला होता. त्याच्या मित्रांनी आणि नातेवाइकांनी याबद्दल विचारणा केली, तेव्हा काहीच उत्तर दिले नाही.

दुसऱ्या दिवशी सोमवारी मंदारने एक फेसबूक लाइव्ह केले. तसेच आपण किती एकटे पडलो याची व्यथा मांडली. यामध्येच आपण आत्महत्या करणार आहोत असेही मंदारने सांगितले आणि फेसबूक लाइव्ह बंद केले. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, यानंतर त्याच्या मित्रांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क झाला नाही तेव्हा त्यांनी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत मंदारचा मृतदेह छताला लटकला होता. पोलिसांनी शेजाऱ्यांसह मंदारच्या कार्यालयात सुद्धा चौकशी करत तपास सुरू केला आहे.