आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नॅशनन डेस्क- सायकलवर फिरून लहान मुलीनां चॉकलेटची लालूच द्यायचा आणि त्यांना अज्ञात स्थळी न्यायचा. त्यांनंतर त्यांचा रेप करून खून करायचा. ही गोष्ट एका भयंकर सीरिअल 'बेबी किलर'ची आहे. अमृतसरच्या ब्यासमध्ये राहणाऱ्या दरबारा सिंगचा जन्म 1952 मध्ये झाला होता. अंगाने बारीक आणि उंच अशा शरिरयष्ठीचा दरबारा भारतीय सेनेत नोकरी करत होता. 1975 मध्ये तो पठानकोटमध्ये एअर फोर्स स्टेशनचा आधिकारी होता. नोकरीच्या दरम्यान त्याच्यावर एका मेजरच्या परिवारावर हॅंड ग्रेनेड फेकल्याचा आरोप लागला होता. पण त्या प्रकरणातून त्याची सुटका करण्यात आली होती. पण तेव्हा कोणीच विचार केला नव्हता की, हा सेनेचा जवान एक राक्षस आहे.
- 1977 मध्ये बलात्कार आणि हत्येच्या पर्यंत्नाच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणात त्याला 30 वर्षांची शिक्षा झाली होती. पण 1996 मध्ये कपूरथलातील एका मजुराच्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामळे दरबारा सिंगचे सगळ्यांसमोर आला. त्यानंतर 2003 मध्ये तुरूंगातील चांगल्या व्यवहारामुळे त्याची दया याचिका मान्य करून त्याची सुटका करण्यात आली.
- तुरूंगातून बाहेर येताच त्याच्या मनात ही गोष्ट घर करून बसली की, एका मजुरामुळे त्याचे आयुष्य खराब झाले त्यामुळे त्याने मजुरांकडून बदला घेण्याचा विचार केला आणि तो एकेक गुन्हे करतच गेला. 2004 मध्ये अचानक अनेक मजूरांच्या घरातून त्यांच्या मुली गायब झाल्या. 23 मुलांच्या गायब होण्याने पोलीसही हैरान झाले होते. पोलिसांनी याच वर्षी सगळ्या पुराव्यानिशी दरबारा सिंग याला अटक केली. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची कबूली दिली होती.
- चौकशी दरम्यान दरबारा सिंगने सांगितले की, त्याने 17 पेक्षा जास्त मुलांचे बलात्कार करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी गाडले आहेत. त्या 17 मध्ये 15 मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. पण पोलिसांना संशय आहे की, त्याने अजून बऱ्याच लोकांचे खुन केले असावेत.
- चौकशीत हेही कळाले की, त्याच्या कुटूंबात पत्नी आणि तिन मुली आहेत. पण त्याच्या वाईट कामांमुळे ते त्याच्या सोबत राहत नाहीत. दरबारा एक बॅग घेऊन सायकलवर बाहेर फिरायचा आणि सकाळी 10 ते 12.30 च्या वेळेत घरातील मजूर कामावर जायचे त्या वेळेत तो मुलांसोबत हे कृत्य करायचा. 2008 मध्ये या 'बेबी किलर'ला न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती, पण या वर्षी न्यायालयात अचानक त्याचा मृत्यु झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.