आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 ची ती काळरात्र पुन्हा न येवाे, नागरे पाटलांनी सांगितल्या त्या दिवसाच्या आठवणी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : सध्या सगळीकडे केवळ अाणि केवळ राजकारणच भरून राहिले असले तरी कुठलाही सच्चा भारतीय २६/११ ही तारीख विसरूच शकत नाही. किंबहुना २६/११ म्हटले की प्रत्येक भारतीयाच्या अाणि विशेषत: मराठी माणसाच्या छातीत धस्स हाेते. सध्याच्या कलुषित वातावरणात तर हे मळभ अधिकच दाटण्याची स्थिती अाणि भिती अाहे. त्या पार्श्वभूमीवर २६/११ च्या थरारात अतिरेक्यांशी झुंज देणारे लढवय्ये अधिकारी अाणि प्रधान समितीने ज्यांच्याबद्दल गाैरवाेद्गार काढले अाहेत, असे मुंबईचे तत्कालीन साऊथ झाेन उपअायुक्त व अाताचे नाशिक पाेलिस अायुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी 'दिव्य मराठी'ने संपर्क साधला असता दशकभरापूर्वीच्या त्या क्षणांच्या नांगरे पाटील यांनी जागविलेल्या अाठवणी...

रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी बिनतारीसंदेश यंत्रणेद्वारे नियंत्रण कक्षावरून ताज हाॅटेलमध्ये अतिरेकी घुसल्याचे अाणि सर्वत्र अंधाधुंद गाेळीबार सुरू असल्याचा संदेश प्राप्त झाला. क्षणाचाही विचार न करता ताजच्या दिशेने वाऱ्याच्या वेगात निघालाे. अवघ्या ११ व्या मिनिटाला म्हणजेच ९ वाजून ५१ मिनिटांनी चार कर्मचाऱ्यांसाेबत हाॅटेलच्या चाैथ्या मजल्यावर घुसलाे अाणि काही कळण्यापूर्वीच साेबतचा पाेलिस कर्मचारी अमित खेतले याला दाेन ठिकाणी गाेळ्या लागल्या. त्यामुळे सावध हाेवून आम्ही सारेच अतिरेक्यांच्या चकमकीला उत्तर देण्यासाठी आणखी सजग झालो.

सुरूवातीला एक-दाेन वाटणारे तब्बल चार अतिरेकी एकाच मजल्यावर असल्याचे समजताच व्यूहरचना अाखून त्यांचा मुकाबला केला. मध्यरात्री पावणेतीनपर्यंत माझ्यासह पथक झुंज देत असताना साेबतचा राज्य राखीव दलाचा जवान राहुल शिंदे याच्या अंगाची अक्षरश: चाळणी झाली आणि ताे धारतीर्थी पडला. शेवटच्या श्र्वासापर्यंत ताे अाम्हाला कव्हर करीत हाेता. त्याचे शाैर्य बघून काेणीही मागे हटत नव्हते, त्याचवेळी अामच्यासाेबत उपअायुक्त राजवर्धन यांचीही कुमक येऊन मिळाली. समाेर एके-४७ सह अत्याधुनिक बंदुकींतून गाेळीबार हाेत असताना माझ्याकडची ग्लाॉक पिस्तूल आणि अन्य सहकारी आपआपल्या तुटपुंज्या शस्त्रसामग्रीनिशी अतिरेक्यांशी लढत होतो. पण अामच्या उरात धग हाेती, ती महाराष्ट्र पाेलिस दलाच्या प्रशिक्षण, धैर्य, शाैर्य अाणि नागरिकांच्या सुरक्षेची. तब्बल सहा तास प्रत्यक्ष मरण अनुभवत असताना सुदैवाने नेव्हल कमांडर व त्यांच्या साथीदार माेर्चा सांभाळत आमच्या साथीला आले. या लढाईत पेालिस जवान अमित खेतले व साैदागर यांनाही गााेळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

राष्ट्रपतींकडून शाैर्यपदकाने सन्मान


२६/११च्या हल्यात अतिरेक्यांशी समाेरासमाेर झुंज देणारे साऊथ मुंबईचे तत्कालीन उपअायुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपअायुक्त राजवर्धन यांच्या कर्तव्याची दखल या घटनेनंतर नियुक्त केलेल्या 'अार.डी.प्रधान अाणि बालचंद्रन अायाेगा'ने घेतली. या अायाेगाने नांगरेपाटील यांच्या पथकाचा उल्लेखनीय असे शाैर्य गाजविल्याचे प्रशस्तीपत्रही दिले. घटना घडल्यानंतर त्यास तत्काळ केलेला प्रतिसादाचा आवर्जून उल्लेखही त्यात केला अाहे. या कामगिरीबद्दल नांगरेपाटील व राजवर्धन यांना राष्ट्रपतींचे सन्नामाचे शाैर्यपदकाने तर पथकातील चाैघांना शाैर्यपदकाने गाैरविण्यात अाले अाहे.

नागरिकांनी सजगता बाळगावी


२६ /११ च्या घटनेनंतर महाराष्य्र पाेलिस दलाने ज्यापद्धतीने अामुलाग्र बदल करीत सुरक्षिततचे धडे घेतले त्याचप्रमाणे भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने अशा घटनांची पुनरावृत्ती हाेणार नाही, यासाठी सजगता बाळगली पाहिजे. कुठलीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाली दिसून अाल्या की लागलीच पाेलिसांपर्यंत त्याची खबर पोहचवली पाहिजे. पाेलिसांचे कान, डाेळे सतर्क राहण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असा संदेश नांगरे पाटील यांनी यानिमित्त 'दिव्य मराठी'शी बोलताना दिला.