आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकच्या 11 आमदारांना मुंबईच्या या फाइव्ह स्टार हॉटलमध्ये ठेवण्यात आले आहे, 8 काँग्रेसच्या तर 3 जेडीएसच्या आमदारांनी केली बंडखोर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप पक्षात बदल करून कर्नाटकातील सरकार पाडत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे राज्याचे जेष्ठ नेते आणि काँग्रेसचे 'संकटमोचक' डी.के. शिवकुमार यांनी मान्य केले की, भावनेच्या भरात त्यांनी बंडखोर आमदारांचे राजीनामे फाडले. ते म्हणाले, 'त्यांना माझ्या विरूद्ध तक्रार करू द्या, मी खूप मोठी रिस्क घेतली आहे. मी असे आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी केले.' एकूण का तर कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार संकटात आहे आणु दुसरीकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेत आहेत. राजीनामा दिल्यानंतर 11 बंडखोर आमदार प्रायव्हेट जटने मुंबईत आले, जिथे त्यांना एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे म्हणने आहे की, "भाजप स्थानीक पक्षांना कमकुवत करत आहेत. मला भीती वाटत आहे, देशात खरच लोकशाही आहे का ?"


कर्नाटकात कुमारस्वामी सरकारवर संकट कोसळले आहे. आतापर्यंत 11 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यात 8 काँग्रेसचे आणि 3 जेडीएसचे आहेत. हे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहेत, जिथे त्यांना सोफिटेल हॉटलमध्ये ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे आपल्या सरकारला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री न्यूयॉर्कवरून परत निघाले आहेत. काँग्रेसनेदेखील कर्नाटकातील सरकार वाचवण्यासाठी आपातकालिन बैठक घेतली, जिथे भाजपवर आमदारांना पैसे देऊन विकत घेतल्याचा आरोप लावला आहे.