Health / चीनमध्ये रुग्णालयात आजारी वडिलांना बोन मॅरो देण्यासाठी वजन वाढवतोय 11 वर्षांचा मुलगा

डॉक्टर म्हणाले, दात्याचे वजन कमीत कमी 45 किलो हवे

वृत्तसंस्था

Jun 12,2019 11:49:00 AM IST

बीजिंग - हेनान प्रांतातील ११ वर्षांचा एक मुलगा अनोख्या प्रयत्नात आहे. त्याला आपल्या वडिलाचे प्राण वाचवायचे आहेत. आजारी पित्याला बोन मॅरो देण्यासाठी तो तयार झाला. खूप आहार सेवन करत, तो आपले वजन वाढवतो आहे. ११ वर्षाच्या लू याचे वडील जिकुआन आजारी आहेत. त्यांना बोन मॅरो प्रत्यारोपित करावे लागणार आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु जो दाता तयार होईल, त्याचे वजन कमीत कमी ४५ किलो तरी हवे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे जिकुआन यांचा मोठा मुलगा तयार झाला.


त्याने आपले वजन ३० किलोवरून ४४ किलोग्रॅमपर्यंत नेले आहे. लू म्हणाला, खूप खाण्याची हिंमत होत नाही. पण तरीही मी सेवन करतोच आहे. वडिलांचे प्राण वाचावेत म्हणून वजन वाढवतो आहे.

X
COMMENT