आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The 12 year old Boy Got A Job As A Data Scientist At A Software Company, Give Credit To His Father

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 वर्षांच्या मुलाला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये डाटा सायंटिस्टची नोकरी मिळाली, वडिलांना दिले श्रेय 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद : येथील एका सॉफ्टवेअर कंपनी मोंटेजी स्मार्ट बिजनेस सॉल्यूशनने 12 वारशाच्या एका मुलाला डाटा सायंटिस्ट म्हणून नियुक्त केले गेले आहे. याचे नाव सिद्धार्थ श्रीवास्तव पिल्लई आहे आणि तो शहरातील चैतन्य शाळेत सातव्या वर्गात शिकतो. 


सिद्धार्थ म्हणाला, ‘‘मी 12 वर्षांचा आहे आणि मोंटेजी स्मार्ट बिजनेस सॉल्यूशन कंपनीमध्ये डाटा सायंटिस्टचे काम करत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी माझे रोल मॉडेल तन्मय बख्शी आहेत, ज्यांनी गूगलमध्ये कमी वयापासूनच काम करायला सुरुवात केली होती आणि ते जगाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की, आर्टीफिशियल इंटेलिजन्स क्रांती किती चांगली आहे.’’

सिद्धार्थने मानले वडिलांचे आभार... 


सिद्धार्थ म्हणाला, ‘‘मी माझ्या वडिलांना धन्यवाद म्हणेन, कारण त्यांनी मला कोडिंग करणे शिकवले. त्यांनीच नोकरी मिळवून देण्यात मला एवढी मदत केली आहे. मी आज जो काही आहे, तो केवळ त्यांच्यामुळे आहे.’’