आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार आठवडे नव्हे 105 दिवसच चालेल 'बिग बॉस' चे 13 वे सीजन, ग्रँड फिनालेची तारीखदेखील झाली आहे फायनल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : सलमान खानने होस्ट केलेला सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस लवकरच आपल्या १३ व्या सीझनसह पुन्हा सुरू होणार आहे. काही आठवड्यांपूर्वी शोच्या निर्मात्यांनी त्याचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला हाेता. त्यात हा शो फक्त चार आठवडे चालले असे सांगण्यात आले हाेते. आता मात्र शोच्या निर्मात्यांनी अंतिम तारीख निश्चित केली असल्याचे वृत्त आहे. आता हा शो चार आठवड्यांत संपणार नाही, तर मागील सीझनप्रमाणे हे सीझनदेखील १०५ दिवसाचे राहणार आहे. निर्मात्यांनी अंतिम कार्यक्रमासाठी सलमानची तारीख आधीच लॉक केली आहे. शोचा ग्रँड फिनाले पुढच्या वर्षी म्हणजेच ४ जानेवारी २०२० रोजी होईल.

लॉन्चच्यावेळी सलमान बोलला होता ट्विस्टबद्दल... 
काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस 13' च्या लॉन्चवर सलमान खानने यामध्ये होणाऱ्या ट्विस्ट आणि टर्नविषयी सांगितले. तो म्हणाला होता, "एका प्रोमोमध्ये सांगितले होते की, या शोचा फिनाले 4 आठवड्यात होईल. त्यानंतर एक मोठा ट्विस्ट येईल. पण मी स्पष्ट करू इच्छितो की, 29 सप्टेंबरला शो ऑनएअर होईल. एका महिन्यात आम्ही फिनाले दाखवू त्यानंतर पुढच्या दोन महिन्यांपर्यंत प्रेक्षकांना खूप ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळणार आहेत."

बातम्या आणखी आहेत...