आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका : ज्यूंचे 143 वर्षे जुने चर्च ट्रान्सपोर्टर रोबोटच्या साहाय्याने दोन किमी दूर हलवले, आता संग्रहालय होणार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरात ज्यूंचे १४३ वर्षे जुने चर्च दोन किमी दूर अंतरावर स्थलांतरित करण्यात आले. सेंट नॉर्थवेस्टमध्य स्थलांतरित करताना १२८ टायर्सच्या ट्रान्सपोर्टर रोबोटची मदत घेण्यात आली. आता या चर्चचे संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत जेव्हा स्थलांतरित करण्यात येत होती तेव्हा ७० हून अधिक रक्षक ट्रान्सपोर्टरच्या चारही बाजूंनी चालत होते. या चर्चला दोन किमी स्थलांतरित करण्यास ८ तासांचा कालावधी लागला. हे चर्च २५ हजार चौरस मीटर जागेत पक्क्या विटांपासून तयार केलेले आहे. 

 

- 2000 टन वजनाचे २५ हजार चौरस फुटांत विटांपासून तयार केलेले प्रार्थनाघर 
- 128 टायर्स असलेल्या ट्रान्सपोर्टर रोबोटच्या साहायाने ७० रक्षकांच्या बंदोबस्तात स्थलांतरित 
- 25 हजार चौरस फुटांत बांधून तयार करण्यात आले होते प्रार्थनाघर 

 

१८७६ मध्ये बांधून तयार झाले होते 
ज्यू ऐतिहासिक सोसायटीच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, हे चर्च १८७६ मध्ये बांधून तयार करण्यात आले. त्यावेळी अमेरिकेचे १८ वे अध्यक्ष यूलिसिस एस. ग्रँट याच्या उद्घाटनास आले होते. यहुदीचा इतिहास सांगणारे संग्रहालय २०२१ मध्ये तयार करण्यात येणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...