Home | Sports | Other Sports | The 18-year-old Jemima of Mumbai, practicing childhood to prepare for the T20 World Cup

मुंबईच्या 18 वर्षीय जेमिमाचा टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी मुलांसाेबत सराव

दिव्य मराठी | Update - Nov 11, 2018, 10:05 AM IST

भारतीय संघातील प्रतिभावंत खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.

 • The 18-year-old Jemima of Mumbai, practicing childhood to prepare for the T20 World Cup

  जर जेमिमा राॅड्रिग्जला एका शब्दात व्यक्त करायचे असल्यास ‘पाॅझिटिव्ही’ हा शब्दच महत्त्वाचा ठरेल. कारण, तिच्यामध्ये प्रचंड सकारात्मक विचार अाहेत. ती देवाला सर्वात माेठी शक्ती मानते. देवाकडूनच अापल्याला सकारात्मक विचाराची सर्वात माेठी ऊर्जा मिळते, असे तिचे मत अाहे. दाैऱ्यावर नसताना ती नित्यनेमाने चर्चमध्ये जाते. भारतीय संघातील प्रतिभावंत खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.

  तिने क्रिकेटमधील पदार्पणापूर्वी वयाच्या १७ व्या वर्षी राज्यस्तरीय हाॅकी स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले हाेते. तिची हाॅकीतील कामगिरीही वाखाणण्याजाेगी ठरलेली अाहे. याशिवाय तिला संगीताचे भारी वेड अाहे. ती स्वत: चांगल्या प्रकारे गिटार वाजवते. यातही अाता ती चांगलीच तरबेज हाेत अाहे. तिने क्रिकेट अाणि हाॅकीशिवाय फुटबाॅल, बास्केटबाॅलचेही प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिच्यात मल्टी स्किल असल्याचे दिसून येते. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात जेमिमाची दक्षिण अाफ्रिका दाैऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. तेव्हापासून भारतीय महिला संघ विश्वचषक जिंकेल, असाच ती विचार करत अाहे. तिने फेब्रुवारीमध्ये टी-२० अाणि मार्च महिन्यात वनडेत पदार्पण केले हाेते.

  अाता सध्या जेमिमा ही विंडीजमध्ये टी-२०चा वर्ल्डकप खेळत अाहे. तिने अापल्या करिअरमधील या पहिल्याच वर्ल्डकपमध्ये दमदार पदार्पण केले. तिने पदार्पणाचा सलामी सामनाच गाजवला. तिने या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. यासह तिने स्पर्धेत अापला दबदबा निर्माण केला. विश्वचषकात अर्धशतक साजरे करणारी जेमिमा ही सर्वात युवा फलंदाज ठरली.


  तिने या स्पर्धेच्या तयारीसाठी मुंबईच्या एमअायजी क्लबमधील मुलांसाेबत खास सराव केला. त्यांच्या गाेलंदाजीवर तिने कसून सराव केला. याच मेहनतीचे फळही तिला सलामीच्या सामन्यात मिळाले. यासाठी घेतल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर तिने पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठाेकले. मुंबईच्या सब अर्बन परिसरातील भांडूपमध्ये ५ सप्टेंबर २००० मध्ये जेमिमाचा जन्म झाला. तिचे वडील इवान राॅड्रिग्ज हेही क्रिकेटपटू हाेते. ते तिला बांद्रा येथील क्लबमध्ये क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊ लागले. यामुळे तिने लहानपणापासूनच अापले दाेन्ही भाऊ अाणि वडिलांसाेबत क्रिकेटचे धडे गिरवले. यादरम्यान तिला अाईचीही माेलाची साथ मिळाली. तिची अाई लविता ह्या न्यूट्रीशन अाणि डायटवर लक्ष ठेवून अाहेत. त्यामुळेच जेमिमाला सातत्याने अापला फिटनेस कायम ठेवता अाला.


  जेमिमा ही अापल्या जीवनात राेहित शर्माला राेल माॅडेल मानते. तिने वयाच्या १३ व्या वर्षीच महाराष्ट्राच्या युवा क्रिकेट संघात स्थान मिळवले हाेते. तिने दाेन सत्र गाजवले. त्यामुळे तिने २०१६-१७ च्या सत्रात १० डावात २ शतकांसह ६६५ धावा काढल्या हाेत्या. ती यादरम्यान स्पर्धेतील टाॅप स्काेअरर ठरली हाेती.

  यशस्वी कामगिरी
  - २०१३ : साडेबाराव्या वर्षी मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात निवड
  - २०१४ : १७ वर्षांखालील मुंबई हाॅकी संघात
  - २०१६ : मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची कर्णधार व हाॅकी संघात निवड
  - २०१७ : मुंबईकडून साैराष्ट्रविरुद्ध शानदार द्विशतक. १९ वर्षांखालील स्पर्धेत १०१३ धावा, १९ विकेट
  - २०१८ : भारताकडून वनडे व टी-२० मध्ये पदार्पण. अाता वयाच्या १८ व्या वर्षी वर्ल्डकप खेळत अाहे.

Trending