Home | National | Other State | The 2500 year old Pushkarni river water is over in Bihar

बिहारमधील 2500 वर्षे प्राचीन पुष्करणी नदी आटली; पाणीपातळी 4 फूट खोल गेल्याने हापसे कोरडे, लोकांना पाणीटंचाई जाणवणार 

दिव्य मराठी | Update - Jan 14, 2019, 08:13 AM IST

नदीजवळ विश्व शांती स्तूप असल्याने दरवर्षी लाखो लाेक येतात. 

 • The 2500 year old Pushkarni river water is over in Bihar

  वैशाली- बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील २५०० वर्षे प्राचीन अभिषेक पुष्करणी नदी कोरडीठाक पडली आहे. नदीचे पाणी आटल्याने आजूबाजूच्या गावातील हापसे कोरडेठाक पडले आहेत. यामुळे तिरहूत कालव्यात पुरेसे पाणी नाही. या नदीपासून ४ किमी दूर अंतरावरील माणिकपूर येथून वाहणारा तिरहूत कालवा पावसाळ्यात ओसंडून वाहत असतो. यामुळे ही नदी कधीच आटली नव्हती. आता जलसंधारण विभागाचे अधिकारी तिरहूत कालव्यात पाणी आणण्यासाठी विचार करत आहेत. पुष्करणीजवळच बौद्ध समाजाच्या वतीने तयार केलेले स्तूप असून येथे लाखो लोक दरवर्षी येतात.

  ऐतिहासिक लिच्छवी गणराज्यात नव्या शासकांची नियुक्ती होताच या नदीच्या पाण्याने त्याच्यावर अभिषेक केला जात असे. नदीच्या पवित्र पाण्याने शुद्धी करून लिच्छवी शासक लोकशाही सभागृहात बसत असत. या नदीत आजूबाजूचे लोक शुभमुहूर्तावर स्नान करत असत. या नदीला गंगेचा दर्जा प्राप्त होता.

  - 25 दिवसांच्या आत जलसंधारण विभागास प्रकल्प तयार करण्याचे आदेश
  - 550 मीटर लांब व ३०० मीटर रुंद अभिषेक पुष्करणी नदी
  - 4 किमीवरून येणाऱ्या कालव्यामुळे भरलेली असायची ऐतिहासिक नदी

Trending