आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये हाइड पार्कसमोरील ४५ खोल्यांची हवेली १,८५० कोटी रुपयांत विकणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - चिनी मालमत्ता सम्राट चेउंग चुंग किऊ लंडनमध्ये हाइड पार्कसमोरील ४५ खोल्यांची हवेली १,८५० कोटी रुपयांत (२० कोटी पौंड) खरेदी करण्यास तयार आहे.  व्यवहार पूर्ण झाल्यानंतर हे ब्रिटनमधील आतापर्यंतचे सर्वात महागडे घर ठरणार आहे.

  • ही सातमजली हवेली १८३० मध्ये तयार झाली. यामध्ये ४५ खोल्या असून त्यात २० बेडरूम, एक स्विमिंग पूल, प्रायव्हेट हेल्थ स्पा, लिफ्ट आणि अनेक कारसाठी अंडरग्राउंड पार्किंग आहे.
  • हे घर लंडनच्या केसिंग्टन गार्डनच्या दक्षिण भागात आहे. याच्या ६८ खिडक्यांतून पार्क दिसते. हवेलीतील अंतर्गत सजावट फ्रान्सचे प्रसिद्ध अलबर्टा पिंटो यांनी केली होती.
  • याआधीचे मालक सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स सुलतान अब्दुल अजीज यांचे २०११ मध्ये निधन झाले. लेबनॉनचे दोन वेळचे पंतप्रधान रफिक हरीरीही या घराचे मालक होते.
बातम्या आणखी आहेत...