आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्जवला योजनेअंतर्गत 100 दिवसांत आठ कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्याचा सरकारचा निर्धार; आता मिळणार पाच किलोचा छोटू सिलेंडर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी 'उज्जवला योजनेचा' विस्तार केला जाणार आहे. पहिल्या कार्यकाळात या योजनेची खूप चर्चा झाली. त्यामुळे मोदी सरकार आता दुसऱ्या कार्यकाळात याचा विस्तार करून या योजनेअंतर्गत गरीब महिलांसाठी पाच किलोचे सिलेंडर देण्याची तयारी करत आहे. या सिलेंडरमुळे लोक अधिक सिलेंडरचा भरणा करू शकतील.


180 रुपयात भरून मिळेल छोटू सिलेंडर
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी शंभर दिवसांमध्ये उज्जवला योजनेअंतर्गत जवळपास 8 कोटी लोकांना याचे कनेक्शन देण्याचा पेट्रोलियम मंत्रालयाने निर्धार केला आहे. तसेच, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 4.19 कोटी कनेक्शन दिले गेले आहेत. उज्जवला योजनेची पूर्तता झाल्यानंतर पाच किलोचे सिलेंडर देणे अनिवार्य करण्यात येईल, कारण या योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मोठ्या सिलेंडरला भरण्यासाठी 700 ते 800 रूपये खर्च करावे लागतात. त्यामुळे सिलेंडरचा लोक पुनःभरणा करत नव्हते. आणि यावर कोणतीही सवलत मिळत नव्हती. पण आता पाच किलोचे सिलेंडर भरण्यासाठी 260 रुपये खर्च होईल आणि यावर 80 रुपये सब्सिडी म्हणून आपल्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे आपल्याला हा सिलेंडर फक्त 180 रुपयांना मिळते.

 

योजने अंतर्गत गॅस कनेक्शनचा खर्च सरकार करते
2016 साली उत्तरप्रदेशमधून या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले होते. हे कनेक्शन कुटुंबातील महिलेच्या नावावर जारी करण्यात आले होते. तसेच, याचा 1600 रूपये खर्च शासनाकडे होता. या योजनेअंतर्गत लोकांना एक शेगडी, 14.2 किलोचे सिलेंडर आणि रेग्यूलेटर देण्यात आले होते. 

 

दरवर्षी देण्यात येणार तीन सिलेंडर
उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या कनेक्शनमध्ये लोक वर्षाला सरासरी फक्त तीन वेळेसच भरणा करतात. संपूर्ण देशातील नागरिक एका वर्षामध्ये सात वेळेस भरणा करतात. त्यामुळे हा आकडा राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी आहे. दिल्लीमध्ये सध्या 14.2 किलोचे एक सिलेंडर 712 रुपयांना मिळते आणि यावर 215 रुपयांची सब्सिडी मिळते.

बातम्या आणखी आहेत...