आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेट डेस्क- लोकप्रिय रोमँटिक मालिका 'उन दिनों की बात है' तरुणांमध्ये खूप हिट झाली. समीर (रणदीप राय) आणि नैना (आशी सिंह) यांना समैना आणि त्यांच्या प्रेमकथेसाठी ओळखले जाते. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे, ही मालिका लवकरच बंद होणार आहे. आशी सिंह सांगते, हो, खरंच ही मालिका लवकरच बंद होणार आहे. आमच्यासाठी ही वाईट बातमी आहे. आम्हाला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा मला रडू आले. बराच वेळ कुणाशीही बोलले नाही. आमच्या चाहत्यांनाही वाईट वाटत असेल, मात्र कधी ना कधी ही मालिका संपणार होती.
टीव्ही जगतात नवनवीन मालिका येण्याचा ट्रेंड सुरू आहे. प्रत्येक वाहिनीवर वेगळा किंवा सामाजिक चालीरीतींवर भाष्य करणारा विषय घेऊन मालिका बनवल्या जातात. यातील काही मालिकांना यश मिळते, तर काहींना अशक्त कथा आणि संकल्पना चांगली नसल्याने टीआरपी मिळत नाही. त्यामुळे यापैकी काही मालिका लवकरच बंद होणार आहेत.
1. लेडीज स्पेशल
प्रीमियर टाइम : नोव्हेंबर 2018
ऑफ-एअर टाइम : ऑगस्ट 2019
लेडीज स्पेशल ही मालिका तीन स्थानिक रेल्वे प्रवासी महिलांच्या जीवनावर आधारित आहे. लवकरच ही मालिका बंद होणार आहे. सूत्रानुसार..., अमिताभ बच्चन यांचा रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' याच्या जागी दाखवला जाणार आाहे. या मालिकेतील तीन अभिनेत्री छवी पांडे, गिरिजा ओक आणि बिजल जोशी रेल्वेत प्रवास करताना मैत्रिणी होतात. मालिकेला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
2. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो
प्रीमियर टाइम : सप्टेंबर 2018
ऑफ-एअर टाइम : जुलै 2019
सप्टेंबर 2018 मध्ये सुरू झालेली 'मैं मायके चली जाऊंगी तुम देखती रहियो' ही मालिका सुरुवातीला लोकांना आकर्षित करू शकली नाही. मात्र, काही आठवड्यांनंतर तिला चांगला प्रतिसाद मिळाला, तरीही टीआरपी चार्ट यशस्वी झाले नाही. आता बंद होणार आहे. मालिकेची कथा सुरुवातीला थोडी वीक होती, नंतर त्यात बदल करण्यात आला होता.
3. ये उन दिनों की बात है
प्रीमियर टाइम : सप्टेंबर 2017
ऑफ-एअर टाइम : ऑगस्ट 2019
4. केसरी नंदन
प्रीमियर टाइम : जानेवारी 2019
ऑफ-एअर टाइम : जुलै 2019
काँटिलो प्रॉडक्शन निर्मित 'केसरी नंदन' एक युवा मुलगी केसरी (चाहत तिवानी)ची कथा आहे. तिला आपले वडील हनुमंत सिंह (मानव गोहिल) प्रमाणे पहिलवान होण्याची इच्छा असते. या मालिकेला लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मेरी कोम आणि गीता फोगट यांनी लाँच केले होते. सुरुवातीच्या आठवड्यात चांगली चर्चा होती. मात्र, सहा महिन्यांनंतर मालिका बंद होण्याची वेळ आली आहे.
5. झांसी की रानी
प्रीमियर टाइम : फेब्रुवारी 2019
ऑफ-एअर टाइम : जुलै 2019
ऐतिहासिक मालिका 'झांसी की रानी' सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीच्या जवळपासही पोहोचली नाही. याच्या नंबरातही वाढ झाली नाही आणि त्याच्या टीआरपी रेटिंगमध्येही चांगली जागा मिळाली नाही. त्यामुळे वाहिनीने ती मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.