आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The 61 year old Former Postman Has Not Delivered 24,000 Letters, Office Apologized

61 वर्षीय माजी पोस्टमनने 24 हजार पत्र डिलीव्हर केले नाहीत, अधिकाऱ्यांना मागावी लागली माफी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांनी माफी मागून पत्र लवकरात लवकर डिलीव्हर करण्याची माहिती दिली

योकोहामा-  जापानमधील एका माजी पोस्टमनने 24 हजार पत्र दिलेल्या पत्यावर पोहचवले नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणामुळे पोस्ट ऑफीस अधिकाऱ्यांनी माफी मागितली आणि लवकरात लवकर पत्र डिलीव्हर करण्याचे वचन दिले. 

प्रकरण कानागावा चे आहे. येथील मुख्य पोस्टमनने मागील 16 वर्षांपासून पत्र डिलीव्हर केलेच नाहीत. जेव्हा लोकांना आपले पत्र मिळाले नाहीत, तेव्हा त्यांनी तक्रार केली. विभागीय चौकशीत याकोहामा पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांना समजले की, पोस्टमन हे पत्र डिलीव्हर करत नव्हता. त्याच्या घराची तपासणी केली असता हे 24 हजार पत्र त्याच्या घरात आढळली.
जापान पोलिसांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितले की, मुख्य पोस्टमनने पत्र डिलीव्हर करण्यास कंटाळा केला. तो पोस्ट ऑफीसमधून पत्र घेऊन जायचा आणि त्यांना पत्यावर पोहचवण्याऐवजी आपल्या घरात ठेवायचा. याबाबत त्या पोस्टमनने सांगितेले की, त्याच्यावर पत्र डिलीव्हर करण्याचा खूप दबाव होता आणि जुनियर्ससमोर बढाई मारण्यासाठी मी जास्त पत्र घेऊन जायचे आणि त्यांना डिलीव्हर करण्याऐवजी घरात ठेवायचो.