आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिली बिझनेसवर सातवी आशियाई परिषद 2 फेब्रुवारीला; एकाच व्यासपीठावर असतील 30 उद्योजक व 350 प्रतिनिधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबादमध्ये २ आणि ३ फेब्रुवारी रोजी देशातील व्यावसायिक घराण्यांची सातवी आशियाई परिषद होणार आहे. या वेळेचा विषय 'पिढ्यान पिढ्यांच्या कौटुंबिक व्यवसाय वारशाची सौजन्यपूर्वक निर्मिती' असा आहे. या वेळी कौटुंबिक व्यवसायाला यशस्वी बनवण्यासाठी सुप्रसिद्ध कौटुंबिक बिझनेस लीडर आणि तज्ज्ञ त्यांचे अनुभव शेअर करतील. 

 

संमेलनाविषयी सांगताना आयएसबीचे प्रो. कवील रामचंद्रन यांनी सांगितले की, 'ही परिषद व्यावसायिक कुटुंबासाठी चांगले व्यासपीठ ठरले आहे. या माध्यमातून ते व्यवसायाला यशस्वी बनवण्याचा मंत्र समजून घेऊ शकतात. या व्यासपीठावरून ३० पेक्षा जास्त कौटुंबिक बिझनेस लीडर आणि तज्ज्ञांचा अनुभव ऐकण्याची संधी मिळेल.' कौटुंबिक व्यवसायाला महत्त्व देणारे हे आशियातील महत्त्वाचे संमेलन आहे. यामध्ये ३५० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होती. या परिषदेमध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्यास www.isb.edu/seventhfbconference वर नोंदणी करता येईल. दुसऱ्या पर्यायांमध्ये आयोजन समितीला 'इंडियन स्कूल ऑफ बिझनेस' ला डीडी/धनादेश पाठवू शकतात आणि नोंदणी शुल्क हस्तांतरित करू शकता. 

 

या वेळी वक्त्यांमध्ये सीएएसएस बिझनेस स्कूल लंडनचे अजय भल्ला, सुप्रजीत ग्रुप ऑफ कंपनीजचे अजित कुमार राय, अरविंद आय केअर सिस्टिमचे अरविंद श्रीनिवासन, एचडीएफसीचे दीपक पारेख, अरबिंदो फार्माचे गोविंदराजन नारायणन, अपोलो हाॅस्पिटलच्या सुनीता रेड्डी प्रमुख आहेत. 

बातम्या आणखी आहेत...