आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The 90 year old Tree's Bark Was Removed And Dried; A Fine Of Rs 55 Lac Decided By A Court In England

90 वर्षांच्या जुन्या झाडाची साल काढून ती वाळवली; 55 लाख रुपये केला दंड, इंग्लंडच्या कोर्टात झाडाचे नुकसान केल्याचे सिद्ध

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

लंडन : इंग्लंडच्या एस्सेक्समध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला न्यायालयाने ६० हजार डॉलर (सुमारे ५५ लाख रुपये) दंड ठोठावला आहे. यासंदर्भात माहिती अशी की, स्टीफन लॉरेन्स यांना घराजवळ असलेले झाड वाळवून टाकायचे होते. यासाठी त्यांनी झाडाची साल काढण्यास सुरुवात केली. त्यांनी या आधी झाड काढून टाकावे म्हणून स्थानिक प्रशासनास दोन अर्जही दिले होते. परंतु दोन्ही अर्ज फेटाळण्यात आले. त्यानंतर त्यांनी झाडाची साल काढली. त्याला दोन छेद देण्यात आले. त्यामुळे झाड लवकर वाळेल आणि ते काढणे सोपे जाईल. स्थानिक लोकांनी यावर आक्षेप घेतला आणि तक्रार केली. पोलिसांनी स्टीफन यांना अटक केली. न्यायालयाने त्याला दोषी ठरवून दंड केला.

झाडाखाली मुले खेळतात हेे महत्त्वाचे

सस्टेनेबल कम्युनिटीज कॅबिनेटचे सदस्य व कौन्सिलर माइक मॅक्रॉरी यांनी म्हटले, दंडाची रक्कम झाडाचे वय व त्याचे मूल्य पाहता, ठरविण्यात आली होती. हे झाड खूप जुने आहे. लहान मुले या झाडाखाली खेळतात. तो कार्बन शोषून घेतो यामुळे पर्यावरणासाठी हे उपयुक्त आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार १९०८ मध्ये घर बांधल्यानंतर २० वर्षांनी झाड लावले होते.
 

बातम्या आणखी आहेत...