आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Accidental Prime Minister Director, Vijay Gutte Mother Files Domestic Violence

'द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर'च्या डायरेक्टरच्या आईने पतीवर लावले हरॅसमेंटचे आरोप, म्हणाली - सासरचे लोक करतात टॉर्चर, प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. अनुपम खेर यांचा 'द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' रिलीज झाल्यानंतरही वादात अडकला आहे, तर आता चित्रपटाचे डायरेक्टर विजय गुट्टेही वादात अडकले आहे. विजय यांच्या आई सुदामती गुट्टेने पती रत्नाकर गुट्टेंवर हरॅसमेंटचे आरोप लावले आहेत. सुदामतीने आरोप करत म्हटले की, पतीसोबतच त्यांच्या कुटूंबाच्या अजून 6 सदस्य त्यांचा छळ करत आहेत. 

 

दाखल केली तक्रार 
- तक्रार दाखल करुन सुदामतीने सांगितले - रत्नाकर आणि त्याची फॅमिली त्यांना मेंटली आणि फिजिकली टॉर्चर करते. त्यांच्यावर नेहमीच प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचा दबाव टाकला जातो. रिपोर्टनुसार सुदामतीच्या तक्रारीवर रत्नाकर आणि त्यांच्या कुटूंबाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

 

विजयवर 34 कोटींच्या जीएसटी फ्रॉडचा आरोप 
डायरेक्टर विजय गुट्टेला 34 कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्या फर्मवर, व्हीआरजी डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेडवर फेक इनवॉइसच्या माध्यमातून जीएसटीसंबंधीत घोटाळा करण्याचा आरोप होता. विजयवर सीजीएसटी अॅक्टनुसार 132 कलमनुसार तक्रार दाखल करण्यात आली होती. 


- विजय गुट्टेच्या कंपनीवर, त्यांनी हॉरिजन ऑउटसोर्स सोल्यूशंस प्रायव्हेट लिमिटेडने अॅनीमेशन आणि मॅनपावर सर्व्हिस घेण्यासाठी फेक इनवॉइसचा वापर केल्याचा आरोप होता. हॉरिजन कंपनी यापुर्वीच 170 कोटींच्या जीएसटी घोटाळ्याच्या आरोपाखाली सरकारी एजेंसीच्या रडारवर होती. कोर्ट डोक्यूमेंटनुसार, व्हीआरजी डिजिटल क्रॉपने सेंट्रल व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (CENVAT)विरुध्द सरकारकडून चुकीच्या पध्दतीने 28 कोटी रुपयांची कॅश रिफंड क्लेम केला होता. 
- विजयचे वडील रत्नाकर गुट्टे 2014 मध्ये विधानसभा निवडणूकीत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे विधानसभेचे भाजपाचे उमेदवार होते. पण त्यांना एनसीपीच्या मधुसूदन केंद्रे यांसमोर पराभव स्विकारावा लागला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...