आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\'चा ट्रेलर झाला रिलिज, अनुपम खेर आहेत मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क -  ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आगामी सिनेमा 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'चा ट्रेलर रिलिज झाला आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात अनुपम खेर हे मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 

ट्रेलरमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या जीवनात आलेले चांगले-वाईट प्रसंग दाखवले आहेत. सोनिया गांधी यांची भूमिका जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नेट आणि राहुल गांधींची भूमिका अर्जुन माथुरने साकारली आहे. अहाना कुमरा हिने प्रियांका गांधी यांचा रोल केला आहे तर दिव्या सेठने मनमोहन सिंग यांची पत्नी गुरशरण कौरची भूमिका केली आहे.

 

मनमोहन सिंग यांचे पूर्वीचे मीडिया सल्लागार यांच्या पुस्तकावरून बनला आहे सिनेमा.. 
लेखक संजय बारू यांचे पुस्तक 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' यावर आधारित आहे. हे पुस्तक 2014 मध्ये प्रकाशित झाले होते. सिनेमात  बारू यांचा रोल अक्षय खन्नाने केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टेने केले आहे. जे आत्तापर्यंत डायरेक्टर हंसल मेहतासोबत क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम करत होते. 

 

140 पेक्षा जास्त कलाकार.. 
मनमोहन सिंग यांच्या बायोपिकमध्ये विनोद मेहता, सीताराम येचुरी, ए. राजा, एपीजे अब्दुल कलाम, लालू प्रसाद, मायावती, सुषमा स्वराज, अमर सिंह, कपिल सिब्बल, ज्योति बसु, प्रणब मुखर्जी, नटवर सिंह, पीवी नरसिम्हा राव, अजित पिल्लई, शिवराज पाटिल, अर्जुन सिंह आणि उमा भारती यांसारखे अनेक नेत्यांच्या भूमिकाही आहेत. त्यासाठीही तितकेच कलाकार या चित्रपटात आहेत. असे सर्व मिळून या चित्रपटात एकूण 140 कलाकार दिसणार आहेत. चित्रपट 11 जानेवारी 2019 ला रिलिज होणार आहे. फिल्मचे प्रोडक्शन बोहरा ब्रदर्स करत आहेत तसेच चित्रपटाचे स्क्रिप्ट मयंक तिवारीने लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...