आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर, त्यांचे पती, निंबर्गी, कामाटी, महागावकरांवर विषप्रयोगाचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर -भाजपचे माजी सभागृह नेते व ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी सोेमवारी पत्रकार परिषद घेऊन विषप्रयोग प्रकरणी संशयितांची नावे जाहीर केली. महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर आणि नगरसेवक सुनील कामाटी यांनीच माझ्यावर विषप्रयोग करून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट केला. पक्षातील नेत्यांवरच आरोप झाल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा बुधवारपासून पोलिसांच्या विरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. दरम्यान या आरोपात तथ्य नसून पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करू, असे महापौर बनशेट्टी, निंबर्गी व इतरांनी सांगितले.


नगरसेवक पाटील यांनी विषप्रयोग प्रकरणी जोडभावी पोलिस ठाण्यात फिर्यादी जबाब दिला आहे. याप्रकरणी चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पाटील समर्थकांनी मोर्चाही काढलेला आहे. शिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. पोलिसांनी सातवेळा पाटील यांचा जबाब घेतला. तरीही गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत नसल्याने सोमवारी सुरेश पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांकडे जबाब दिला. त्यात हकीकत स्पष्ट करताना संशयितांची नावे जाहीर केली

बातम्या आणखी आहेत...