आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरणागतीसाठी आला ताहिर, जज म्हणाले- हा माझा खटला नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयबी अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोपी नगरसेवक अटकेत
  • दंगलीत आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी गुरुवारी आयबी अधिकारी अंकित शर्मांच्या हत्येचा आरोपी आम आदमी पक्षाचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला न्यायालय परिसरातून अटक केली. ताहिर न्यायालयात शरण घेण्यासाठी आला होता. त्याने शरणागतीसाठी याचिका केली होती. ती न्यायालयाने फेटाळली. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट विशाल पाहुजा यांनी सांगितले की, ताहिर यांनी जो दिलासा मागितला आहे तो त्यांच्या न्यायालयाच्या कक्षेबाहेरचा आहे. याचिकेत ताहिरने म्हटले होते की, प्रकरणाच्या चौकशीत त्याला सहकार्य करायचे आहे. त्याला शरण यायचे आहे. ताहिरचे वकील मुकेश कालिया यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, त्यांच्या पक्षकारास ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ताहिरला कडकडडुमा न्यायालयाऐवजी राऊज अॅव्हेन्यू न्यायालयात शरणागतीसाठी याचिका दाखल करावी लागली. त्याला फसवले जात आहे. आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांची हत्या ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात झाली होती. ताहिरच्या विरोधात २८ फेब्रुवारी रोजी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निर्णय : मंदरप्रकरणी हिंसा पीडिताच्या हस्तक्षेपास मंजुरी नाही


सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली हिंसाचाराच्या एका पीडिताला कार्यकर्ते हर्ष मंदर यांच्या वादग्रस्त भाषण प्रकरणात हस्तक्षेपास मंजुरी दिली नाही. वरिष्ठ अधिवक्ता कॉलिन गोन्जाल्विस यांनी गुरुवारी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर प्रकरणाचा उल्लेख केला. गोन्जाल्विस म्हणाले की, हर्ष मंदरच्या प्रकरणात दंगापीडिताला हस्तक्षेप करायचा आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्याने मंदरच्या भाषणाचा व्हिडिओ पाहिला आहे. यावर सरन्यायाधीशांनी सांगितले की, आम्ही तुम्हाला हस्तक्षेप करू देणार नाहीत. आम्ही सॉलिसिटर जनरल यांना याला रेकॉर्डवर ठेवण्यास सांगितले पाेलिस अपयशी ठरल्यास लाेकशाही अपयशी : सुरक्षा सल्लागार डोभाल


गुरगाव । सामान्य माणसासाठी पाेलिस हे विश्वासार्ह असले पाहिजेत. त्याचबराेबर कायद्याची अंमलबजावणी करण्यात ते यशस्वी ठरायला हवेत. त्यात अपयश आल्यास लाेकशाहीदेखील अयशस्वी ठरते, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डाेभाल यांनी म्हटले आहे. गुरुवारी पाेलिस अधीक्षकांच्या तिसऱ्या परिषदेत त्यांनी मार्गदर्शन केले. लाेकशाहीत कायदा तयार करणे अत्यंत पवित्र असे कार्य आहे, असे डोभाल यांनी सांगितले. 

पुढाकार : मुलांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पालक-शिक्षक संमेलन


> दिल्ली शिक्षण संचालनालयाने हिंसाचारानंतर मुलांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पालक- शिक्षक संमेलन आयोजित केले. सीबीआयने सांगितले की, हिंसाग्रस्त भागात गुरुवारी बारावीच्या परीक्षेत ९८% विद्यार्थी उपस्थित होते. 

> उपराज्यपाल अनिल बैजल यांनी हिंसाग्रस्त भागाचा दौरा केला. शांतता समितीची बैठक घेतली. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारींनी सांगितले की, दिल्लीत धान्य वाटप करणार.