आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या तयारीत असलेले आरोपी हत्यारांसह जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता - नगर-मनमाड मार्गावर राहाता पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहा संशयित आरोपींना दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली. एकजण मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. हे सर्व आरोपी येवला, नगर, राहुरी, आष्टी व राहाता तालुक्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.


अणकुचीदार लोखंडी पट्ट्या रस्त्यात टाकून गाड्या पंक्चर करुन वाहनचालकांना मारहाण करत त्यांच्याजवळील ऐवज आरोपी लुटत. गणेश बाळासाहेब शेंडगे (२०, चिंचोली फाटा, ता. राहुरी), अनिल काशिनाथ माळी (१८), आकाश रावसाहेब दुनबळे (१८, दोघे महालखेडा, ता. येवला), सोमनाथ रामदास खलाटे (खलाटेवाडी, ता. आष्टी, जि. बीड), बाळासाहेब शिवाजी पगारे (२३, शिंगवे, ता. राहाता), विश्वास बाळू साळवे (२०, शिंगवे नाईक, ता. जि. नगर) यांना पोलिसांनी अटक केली. यातील एकजण पळून गेला. त्याचे नाव बाबासाहेब ऊर्फ बल्लू भाऊसाहेब साळवे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पकडलेल्या आरोपींकडे काळ्या रंगाची पल्सर (एमएच १५ इजी ३१४१) मोटारसायकल, हीरो होंडा शाईन मोटारसायकल, काळया रंगाची हिरो स्प्लेंडर कंपनीची विनानंबरची मोटारसायकल, तसेच बॅटरी, लोखंडी फायटर, अणकुचीदार सुळे असलेल्या लोखंडी पट्ट्या, बॅटऱ्या, हातोडा, मिरचीची पूड, लोखंडी गज, लोखंडी साखळी, चाकू, मोबाइल हॅण्डसेट आदी १ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला

बातम्या आणखी आहेत...