आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीक मागण्यासाठी भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर उतरला हा अभिनेता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुझसे है राब्ता’ मालिकेत सेहबान अजीम मल्हार राणेची भूमिका साकारत आहे. एका दृशयात अजीमला भिकाऱ्याचा वेश धारण करावा लागला. गेटअपमध्ये आल्यावर तो सरळ रस्त्यावर भीक मागायला गेला. ही भूमिका करणे खूपच अवघड होते, असे तो म्हणाला. या मुलाखतीत त्याने या पात्राविषयी आणि इतर विषयावर चर्चा केली...,  

गुपित जाणून घेण्यासाठी धारण केला वेश
यात अनेक वळण येत आहेत. यात मल्हार राणेला आपली बालपणीची मैत्रीण केतकीकडून अनेक गुपित जाणून घ्यायचे आहे.  त्यामुळे त्याने भिकाऱ्याचा वेश धारण केला आहे. याची शूटिंग सुरू झाली आहे. याचे प्रसारण तीन ते चार दिवस चालेल. खरं तर, टीव्हीवर एक सारखीच भूमिका करून तो कंटाळला होता. अभिनेता म्हणून वेश बदलून नवीन करायला मिळते यात मजा येत असल्याचे तो म्हणाला.
 

भिकाऱ्याच्या वेशात यायला लागला एक तास...
दाढी-मिशा, डोक्यावर केस लावण्यापासून ते पूर्ण गेटअपमध्ये येईपर्यंत एक तास लागतो. तो गेटअप काढण्यातही तितकाच वेळ लागतो. खरं तर, तो वेश धारण केल्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. कारण इतके केस, त्यातल्या त्यात डोक्यावर एक पट्टा, कपडे घातल्यानंतर घाम यायचा. मात्र ते गेटअप काढल्यानंतर पुन्हा करायला तितकाच वेळ लागेल म्हणून मला थोडा त्रास सहन करावा लागला. 
 

वेश धारण केल्यानंतर भीक मागायला गेलाे रस्त्यावर
वेश धारण केल्यानंतर एकदा ट्राय करायला काय हरकत आहे, असा विचार केला आणि भीक मागायला धडक रस्त्यावर गेलो. मी सेटमधून बाहेर पडत रस्त्यावर आलो आणि भीक मागायला लागालो. लोकांना थांबवून म्हणालो, अल्लाह के नामपर दे दे बंदे. भीक मागून १० ते १२ रुपये जमले होते. थोडे दूर गेल्यानंतर लोकांनी मला ओळखले त्यांनतर ते भीक न देता हसू लागले. अोळखीच्या लोकांनीच मला ओळखले नाही. तेव्हा आणखीनच चांगले वाटले आणि आणखी पुढे चालत गेलो.

पाण्याखालचे शूट फारचं अवघड होते
काही दिवसांपूर्वी पाण्याखाली शूटिंग करण्यात आले हाेते. ते समुद्राजवळ शूट करण्यात आले होते. एका चोराला पकडण्याचे ते दृश्य होते. हे शूटिंग खूपच अवघड होते. खरं तर, त्या पात्राचे कामच तसे आहे त्यामुळे हे सर्व करावे लागते. मात्र असे विविध पात्र साकारल्यामुळे चांगले वाटते.

बातम्या आणखी आहेत...