आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूडमध्ये नायकापेक्षा दुप्पट शुल्क घेतात नायिका; सर्वात जास्त मानधन घेण्यात दीपिका पदुकाेण आघाडीवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कलाकारांच्या मानधनावरून आता बाॅलीवूडमध्ये नवीन ट्रेंड समाेर आला आहे. दीपिका पदुकाेण, कंगना राणावत आणि आलिया भट्टसारख्या कलाकार नायकांपेक्षा जास्त मानधन घेत आहेत. हा बदल फक्त अॅक्टिंगचे मानधन घेण्यासंदर्भात आला नाही. आता बाॅलीवूडमध्ये अनेक कलाकार प्राॅडक्शनच्या क्षेत्रातही उतरले आहेत. लग्नानंतर चित्रपटातील करिअर संपुष्टात येण्याची परंपरा २०१८ मध्ये तुटली हाेती. दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा व प्रियंका चोप्रासारख्या नायिकांचे करिअर लग्नानंतरही वेगाने पुढे जात आहे. 

 

सर्वात जास्त मानधन घेण्यात दीपिका पदुकाेण सर्वात आघाडीवर आहे. सध्या ती १४ ते १६ काेटी मानधन घेत असल्याचे जाणकार सांगतात. पाच वर्षांपूर्वी ती ५ ते ६ काेटी रुपये घेत हाेती. पीकू, बाजीराव मस्तानी व पद्मावतच्या यशामुळे तिची ब्रँड व्हॅल्यू वाढली. दीपिकानंतर कंगना सर्वात महागडी नायिका आहे. तिने मणिकर्णिकासाठी १२ काेटी रुपये घेतल्याचे सांगितले जाते. चित्रपट रिशूट झाल्यावर ३ ते ५ काेटी दिले गेले. क्वीन, रंगून, सिमरनमध्येही नायिकांना नायकापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत. आलिया भट्ट व श्रद्धा कपूर यांनीही मागील वर्षी राजी व स्त्रीसारखे १०० काेटींचे चित्रपट दिले आहेत. आलिया ८, श्रद्धा ६ व सोनम कपूर ७ काेटी रुपये घेते. करिना कपूर-खान माेजकेच चित्रपट करते. ती ११ काेटी घेत असल्याचे म्हटले जाते. 

 

प्राॅडक्शनमध्ये कलाकार :

प्रियंका चाेप्रा आपल्या आईबराेबर प्राॅडक्शन हाऊस चालवते. त्यांनी निर्मिती केलेल्या व्हेंटिलेटर, पाहुणा यांसह अनेक चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत. माेठ्या स्टुडिओच्या मदतीने 'एनएच १०', 'फिल्लौरी' व 'परी' हे चित्रपट बनवले आहेत. आता ते वेब सिरीज तयार करतील. दीपिका पदुकोणनेही प्राॅडक्शन हाऊस सुरू केले आहे.