रेडीरेकनर'ची अट रद्द / रेडीरेकनर'ची अट रद्द केली तरच मालकी हक्काचा फायदा; वाळूजमधील 33, 400 मालमत्ताधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय

एकही सदस्य आक्षेप घेणार नाही, याची काळजी इतर सदस्यांना घ्यावी लागणार. 

Dec 21,2018 10:07:00 AM IST

औरंगाबाद- वाळूजमधील सिडकोच्या सुमारे ३३,४०० मालमत्ताधारकांना मालकी हक्क देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याचे श्रेय घेत भाजपने जल्लोष केला. रेडीरेकनर दराने प्रीमियम भरल्यावरच मालकी हक्क मिळणार आहे. ही रक्कम घर नेमक्या कोणत्या वसाहतीत असेल यावर अवलंबून असेल. त्यामुळे रेडीरेकनरची अट रद्द केली तरच लोकांना निर्णयाचा खरा फायदा मिळणार आहे.

मालकी हक्कासाठी सिडकोचे तत्कालीन मुख्य प्रशासक ओंमप्रकाश बकोरिया यांच्या कार्यकाळात प्रस्ताव पाठवला गेला. विद्यमान मुख्य प्रशासक मधुकरराजे आर्दड यांनी पाठपुरावा केला. सिडकोच्या सर्वेक्षणात औरंगाबाद शहर, वाळूजमधील मालमत्तांपोटी ३४,२६१ कोटी रुपये प्रीमियमपोटी गृहीत धरले आहेत.

अडचणी : त्या दूर करण्यासाठी काय करता येईल
वारसदाराचे नाव नाही : वारसाहक्काचे प्रमाणपत्र न्यायालयातून मिळवावे लागेल.
बाँडवरील व्यवहार : शासनाने निर्णय घेतला पाहिजे,
सोसायटीतील घरे : एकही सदस्य आक्षेप घेणार नाही, याची काळजी इतर सदस्यांना घ्यावी लागणार.
बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र नाही : रक्कम भरून प्रमाणपत्र मिळवता येईल.
हस्तांतरणाचा वाद : कायदेशीर मार्गाने वाद मिटवावा लागेल.

सिडकोच्या मालमत्तांचे आकडे असे
औरंगाबाद शहर : २३ हजार घरे, ९ हजार प्लॉट
वाळूज महानगर १ : ९०० घरे, ८५० प्लॉट
वाळूज २, ४ : ५०० प्लॉट

X