आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान यांना अमेरिकेला घेऊन गेलेले विमान नादुरुस्त झाले नव्हते, तर सौदीच्या युवराजांनी विमान परत बोलावून इम्रान यांना खडसावलेही होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या 'द फ्रायडे टाइम्स' या ३० वर्षे जुन्या नियतकालिकाच्या दाव्यानुसार, संयुक्त राष्ट्रांत इम्रान खान यांच्या भाषणामुळे संतप्त झालेले सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी २७ सप्टेंबरला आपले विमान परत बोलावले होते. या विमानाने इम्रान पाकला परतणार होते. तांत्रिक नादुरुस्तीमुळे विमानाला परत जावे लागले होते असे तेव्हा सांगितले गेले होते, पण प्रत्यक्षात तसे नव्हते. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाग घेण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सौदी अरेबियाला गेले होते. तेथून ते व्यावसायिक विमानानेच न्यूयॉर्कला जाणार होते, पण सौदीच्या युवराजांनी त्यांना अतिथी म्हणून आपले विशेष विमान दिले होते. इम्रान त्याच विमानाने परतत होते, पण त्याला मधूनच परत जावे लागले होते. पाकिस्तान सरकारने मात्र हे वृत्त पूर्णत: चुकीचे, कपोलकल्पित असल्याचे म्हटले आहे. 'फ्रायडे टाइम्स'ने आपल्या वृत्तात इम्रान खान समर्थकांवर हल्ला करताना म्हटले आहे की, इम्रान यांच्या समर्थकांनी न्यूयॉर्कहून परतल्यावर त्यांचे हीरोप्रमाणे स्वागत केले. ते ज्या विमानाने परतत होते त्याला एफ-१७ थंडर विमानांच्या घेऱ्यात सन्मानासह आणण्याचा सल्लाही देण्यात आला होता. या समर्थकांना असे वाटते की, इम्रान यांनी काश्मीर, इस्लामोफोबिया यांसारख्या सर्व विशेष मुद्द्यांवर जोरदार पद्धतीने म्हणणे मांडले. इम्रान यांच्या भाषणादरम्यान हॉल अर्धा रिकामा झाला होता आणि पाकिस्तान अल-कायदाच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षित करतो हे इम्रान यांनी मान्य केले होते याचा काहीही फरक त्यांना पडत नाही. या दौऱ्याचे काही वेगळे परिणामही झाले. पाकिस्तानने इराणशी संबंध मजबूत करण्याबद्दलही सौदीच्या युवराजांना आक्षेप होता.
इराणशी संबंध मजबूत केल्यामुळे प्रिन्सनी नाराजी व्यक्त केली होती

इस्लामिक ब्लॉकच्या तयारीमुळे प्रिन्स संतप्त होते
नियतकालिकाच्या दाव्यानुसार, इम्रान इस्लामिक ब्लॉकचे नेतृत्व करण्याच्या तयारीत होते, यामुळे सौदी प्रिन्स जास्त नाराज झाले. भारत-पाक चर्चेची अपेक्षा आधीपेक्षा खूप कमी झाली आहे आणि त्यांनी एक क्षेत्रीय मुद्दा इस्लामिक पाक आणि हिंदू भारत हा मुद्दा केला आहे यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही.