Home | Gossip | the alcoholic beverages is not sufficient in our marriage, nick jonas said

प्रियांका चोप्राच्या लग्नामध्ये जेव्हा संपली होती बीयर तेव्हा झाला होता मोठा गोंधळ, पती निक जोनस आणि त्याच्या भावांनी केला खुलासा

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 16, 2019, 04:01 PM IST

प्रियांकाचा दीर करणार आहे लग्न, म्हणाला - जी कमी भावाच्या लग्नात राहिली, त्याची केली जाईल खास सोय... 

  • the alcoholic beverages is not sufficient in our marriage, nick jonas said

    मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लगनमध्ये बीयर संपली होती. याचा खुलासा जोनस ब्रदर्सने एका इंटरव्यूदरम्यान केला. झाले असे की, निकचा मोठा भाऊ जो आपल्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल बोलत होता. जो म्हणाला की, तो आणि सोफी टर्नर फ्रांसमध्ये लग्न करतील आणि तिथे खुप बीयरची सोय केली जाईल, जेणेकरून मित्रांना त्याची कमतरता भासणार नाही. जोनुसार, तिथे बीयरची उणीव भासणार नाही, तोही याबाबतीत सतर्क राहू इच्छितो.

    जो म्हणाला : प्रियांका-निकच्या लग्नापासून घेतला धडा...
    इंटरव्यूदरम्यान जो म्हणाला की, निक आणि प्रियांकाच्या लग्नापासून शिकवण घेतली आहे. झाले असे की, या लग्नामध्ये बीयर संपली होती, कारण मुलीकडच्यांना याबाबतीत काहीही माहित नव्हते की, त्यांचे पाहुणे किती बीयर पितात. यादरम्यान निकने हे स्वीकारले. तो म्हणाला, "आमचे मित्र बीयर खूप जास्त पितात, पण आमच्या लग्नाच्यावेळी ती संपली होती, ज्यांनंतर मित्रांनी खूप गोंधळ केला होता." यावेळी निक आणि जोचा धाकटा भाऊ केविननेदेखील आपले म्हणणे मांडले. तो म्हणाला की, बीयर संपल्यानांतर सगळ्या सोयी निरर्थक वाटायला लागल्या होत्या.

Trending