आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Genpact Suicide Case : Swaroop Raj Wife Kirti Told About Her Husband In An Interview

सेक्श्युअल हरॅसमेंट आत्महत्या प्रकरण : स्वरूपच्या पत्नीचा कंपनीवर आरोप - प्रकरणाची चौकशी न करताच पतीला ठरवले दोषी, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा : जेनपॅक्ट कंपनीचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट स्वरूप राज यांचे कुटुंब सध्या धक्क्यामध्ये आहे. स्वरूप यांच्यावर सेक्श्युअल हरॅसमेंटचा आरोप करण्यात आला होता. यामुळे त्यांनी आत्महत्या केली. स्परूपची पत्नी कृतीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, माझे पती ज्या कंपनीची प्रशंसा करत होते त्याच कंपनीने त्यांना दगा दिला आहे. स्वरूप भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जेनपॅक्टमध्ये नोकरी करण्याच सल्ला देत होते. स्वरूपने कंपनीला 11 वर्ष दिले होते. असे असूनही कंपनीने संबंधीत प्रकरणाचा तपास न करता त्यांना नोकरीवरून बरखास्त केले. यामध्ये नक्कीच कंपनीचे षडयंत्र आहे.   

 

स्वरूपच्या पत्नीने उपस्थित केले हे प्रश्न

- स्वरूपच्या पत्नीने प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, एक माणूस जो की आपल्या आयुष्यातील 11 वर्ष कंपनीला देतो, ईमानदारीने काम करतो. तो अशाप्रकारचे काम कसे करू शकतो?

- पुढे त्यांनी सांगितले की, सेक्सुअल हेरेसमेंट कोणच्या मृत्यूचे कारण होत असेल तर असे होता कामा नये. याला बंद करायला हवे.

- कृतीने सांगितले की, कंपनी व्यवस्थापनाने स्वरूपचे म्हणणे ऐकूनच घेतले नाही. एका दिवसात त्याला सस्पेंशन लेटर देऊन घरी पाठवले. 

- प्रकरणाबाबत चौकशी झाली असती, क्रॉस क्वेश्चन सारखे काही झाले असते तर त्यांनी मला सांगितले असते. दोन-तीन लोकांसोबत चर्चा केली असती तर त्यांनी हे पाऊल उचलले नसते.

 

त्या दिवशी नेमके काय घडले? 

- त्यादिवशी कंपनीने स्वरूपचा लॅपटॉप घेतला आणि कंपनीमध्ये कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप करण्यास मना केले. 

- कृतीन सांगितले की, आम्ही सोबतच ऑफिसमधून घरी येत असतो. 
- त्यादिवशी स्वरूपला कॉल केला असता त्याचा फोन स्वीच ऑफ येत होता. मग त्यांच्या मित्राला कॉल केला असता  स्वरूप दुपारीच घरी गेल्याचे त्याने सांगितले. 
- यानंतर आम्ही सोसायटीमध्ये आलो आणि दरवाजा ठोठावला. पण दरवाजा उघडला नाही. त्यानंतर आम्ही सोसायटीच्या काही लोकांना बोलावले. 

- दरवाजा उघडत नसल्यामुळे तो तोडावा लागला. घरात प्रवेश करताच स्वरूप फासावर लटकत असल्याचे दिसले. 

- सुसाइड लेटर आणि कंपनीने दिलेले सस्पेंशन लेटर असे दोन लेटर तेथे सापडले. 

 

2 वर्षांपूर्वी दोघांनी केला होता प्रेमविवाह

- स्वरूप आणि कृती दोघेही एकाच कंपनी नोकरी करत होते. यादरम्यान त्यांच्या जवळीक निर्माण झाली आणि दोन वर्षांपूर्वी दोघांनी लव मॅरेज केले. 

 

आईला केला शेवटचा फोन

- स्वरूप राजने आत्महत्या करण्यापूर्वी आईला फोन केला होता. 

- त्याने फोनवर आईला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले असल्याचे त्याच्या आईने सांगितले. पण त्याच्या बोलण्यावरून तो असे काही करणार असल्याचे वाटले नसल्याचे आईने सांगितले. 
- आईने सांगितले की जर हे आधीच समजले असते तर त्याची समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता. 

 

पत्नीला शेवटपर्यंत मिळली नाही प्रकरणाची माहिती

- कंपनीमधील 2 मुलींनी स्वरूपवर छेडछाड करण्याचा आरोप लावला होता. 

- कंपनी व्यवस्थापन या प्रकरणाची चौकशी करत होते. पण शेवटपर्यंत स्वरूपच्या पत्नीला त्या मुलींविषया माहिती देण्यात आली नाही. 
- कृतीने सांगितले की, याबाबतची चौकशी न करता माझ्या पतीला आरोपी घोषित केले आणि कंपनीतून बडतर्फ केले. यामध्ये कंपनीचे षडयंत्र असल्याचा आरोप तिने केला आहे. 

- कृतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी स्परूप राजवर आरोप करण्याऱ्या मुली आणि कंपनी व्यवस्थापनाविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...