आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीची घोषणा मोदींच्या भारत परतीनंतरच शक्य : विनोद तावडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्याहून २९ तारखेला परतणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेसाठी संसदीय समिती गठित होईल. त्यानंतर उमेदवार निश्चित होतील. त्यासाठी किमान ३० तारीख उजाडेल, असे दिसते आहे. त्यामुळे तोपर्यंत युतीची घोषणा करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे, असे सांगत युतीची घोषणा तातडीने होणार नाही, असेच संकेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिले.

मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या मंत्री तावडे यांनी दैनिकांच्या संपादकांशी अनौपचारिक चर्चा केली. त्या वेळी युती १०० टक्के होईल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. कोणी किती जागा लढवायच्या यावर चर्चा सुरू आहे आणि काही मतदारसंघांबाबतही चर्चा होते आहे. त्याच कारणामुळे युतीची घोषणा व्हायला विलंब होतो आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. युतीबाबत आपल्याला यापेक्षा जास्त काहीही माहिती नाही, असे सांगत अधिक बोलायला मात्र त्यांनी नकार दिला.

विभागनिहाय मीडिया सेंटर्स : भारतीय जनता पक्षाचे आतापर्यंत केवळ मुंबईत मीडिया सेंटर होते. आता प्रत्येक महसूल विभागनिहाय ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.