आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेचा मुहूर्त आजही टळला; जागांबाबत अद्याप तोडगा नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना-भाजप युतीचं घोडं अवघ्या 10 जागांमुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे.
 

काल झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे उपस्थित होते. दरम्यान या चर्चेचा तपशील राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना देण्यात येणार आहे. मात्र युतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शाह घेणार आहेत. 
 

यामुळे युतीच्या घोषणेच्या घाई नको 
युती न झाल्यास दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांना एका जागेवर संधी मिळू शकते. मात्र युती झाली तर एका पक्षातील इच्छुक उमेदवाराला त्या जागेवर पाणी सोडावे लागेल. अशात पक्षांतर बंडाळी किंवा पक्षांतरामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे पक्षाचे एबी फॉर्म वाटपावेळी होणारा वाद टाळण्यासाठी युतीची घोषणा करण्याची घाई नको असा सूर वरिष्ठ पातळीवर असल्याचे समजतंय.