आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Annual Income Of The American Middle Class Is Rs. 28 To 87 Lakhs, It Will Still Be Difficult To Pay For The House

अमेरिकी मध्यमवर्गीयांचे वार्षिक उत्पन्न रु. २८ ते ८६ लाख, तरीही घरखर्च भागवणे मुश्कील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतेक अमेरिकी स्वत:ला मध्यमवर्गीय मानतात. खरे तर अनेकांना घरखर्च भागवणेदेखील मुश्कील हाेत चालले आहे. घराचा ईएमआय किंवा भाडे, अाैषधाेपचार आणि शैक्षणिक खर्चावर उत्पन्नातील बहुतांश वाटा संपून जाताे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न काही वाढत नाही. गेल्या पिढीच्या तुलनेत आजच्या मध्यमवर्गीयांना अधिक तास काम करावे लागते, नव्या तणावांना दररोज ताेंड द्यावे लागते. आर्थिक जाेखीम वाढत चालली आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या २०१९ च्या अहवालानुसार सुमारे ५०% अमेरिकी वयस्क मध्यमवर्गीयांत समाविष्ट हाेतात. तीन व्यक्तींच्या मध्यमवर्गीय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २८ लाख ६८ हजार ४३० रुपये ते ८६ लाख ४० हजार ७०० रुपयांच्या दरम्यान अाहे. घरखर्च चालवण्यात केवळ अमेरिकी मध्यमवर्गीयांनाच अडचणी येत आहेत असे नाही, तर आर्थिक सहकार्य आणि विकास परिषदेनेे एप्रिलमध्ये सादर केलेल्या अहवालानुसार जगभरातील मध्यमवर्गीयांवरील दबाव १९८० च्या दशकाच्या तुलनेत आता अधिक वाढला आहे. उत्पन्नात कमी प्रमाणात हाेत असलेली वाढ, वाढती महागाई आणि असुरक्षित नाेकरीचे अाेझे वाढत चालले आहे. अमेरिकी ग्राहक खर्चाच्या पाहणीतील आकडेवारीनुसार १९०१ मध्ये घरासाठी सरासरी खर्च २३% असायचा, ताे १९५० मध्ये २७% आणि २०१८ मध्ये ३३% वर पाेहाेचला. अमेरिकी कुटुंबाच्या स्वरूपात सातत्याने बदल हाेत आहेत. आता कुटुंबात पती, पत्नीने कमावणे हे सामान्य झाले आहे. १९९० नंतर नाेकरदार महिलांची संख्या वाढली आहे. 'वाॅशिंग्टन सेंटर फाॅर इक्विटेबल ग्राेथ'चे अध्यक्ष हिथर बाऊशी यांनी एका विश्लेषणात सांगितले की, कमावत्या महिलेमुळेे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत हाेत असते. अमांडा राॅड्रिग्ज आणि डेव्हिड एलन दरवर्षी १ काेटी ९ लाख रुपये कमावतात. अमेरिकेतील काही शहरांचा विचार करता त्यांचे उत्पन्न उच्च वर्गात माेडते, मात्र ते सॅनफ्रान्सिस्काेमध्ये राहतात त्यामुळे ते मध्यमवर्गीयात समाविष्ट हाेतात. मे महिन्यात त्यांना कन्यारत्न झाले. आता त्यांचे दाेन तृतीयांश उत्पन्न मुलीची देखभाल, २ बीएचकेच्या भाड्यापाेटी खर्च हाेत आहेत. लारेन आणि ट्रेवर काेच कुटुंबाचा खर्च केवळ एकट‌्याच्या उत्पन्नावर चालताे. ट्रेवर शेफ आहेत. त्यांचे उत्पन्न ३६ लाख रुपयांहून अधिक आहे. मुलाच्या जन्मानंतर लारेन यांनी नाेकरी साेडली. या दांपत्याने मुलाच्या देखभालीचा खर्च वाचवण्याचा विचार केला. दाेघेही निवृत्तीच्या काळासाठी पैसा जमवू शकत नाहीत. त्यांचा सर्वाधिक खर्च घरभाडे, उदरनिर्वाह, कर्जफेड, अाैषधाेपचार, आराेग्य विमा यावर खर्च हाेताे. मेलाने एपिनाेसा आणि तिचे पती ब्रेट टाऊनसेंड यांचे वार्षिक उत्पन्न ६३ लाख रुपये आहे. तरीही त्याच्या बहुतेक गरजा पूर्ण हाेत नाहीत. घर आणि दाेन मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिला बचत करायची आहे. परंतु हे शक्य हाेत नाही. दाेघांची कमाई असतानाही मध्यमवर्गीय दर्जा टिकवणे त्यांना मुश्कील हाेत चालले आहे. हे दांपत्य मन मारून दिवस कंठत आहेत.

४० वर्षांत कुटुंबाचे उत्पन्न २३% वाढले
१९७९ ते २०१८ दरम्यान मध्यमवर्गीय कुटुंबाच्या उत्पन्नात २३.१% वाढ झाली. दुसरीकडे व्यावसायिक कुटुंबाचे उत्पन्न ६८.३% वाढले. या ३९ वर्षांत सरासरी अमेरिकी महिलेच्या वार्षिक कामाच्या तासामध्ये २१% वाढ झाली आहे. नाेकरदार महिलांमुळे कुटुंबाचे एकूण उत्पन्न वाढले आहे. बाऊशी यांच्या मते, जर महिला काम टाळत राहिल्या असत्या तर बहुतेक कुटुंबाचेे उत्पन्न खूप घसरले असते.

बातम्या आणखी आहेत...