Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | The architecture of the kitchen Vastu Tips

वास्तू टिप्स : किचनसमोर असू नये बाथरूम, लक्षात ठेवा अशाच या 7 गोष्टी

रिलिजन डेस्क | Update - Jan 10, 2019, 12:04 AM IST

महिलांवर सर्वात जास्त पडतो किचनच्या वास्तुदोषाचा प्रभाव, ईशान्य दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला बनवू शकता किचन...

 • The architecture of the kitchen Vastu Tips

  वास्तू शास्त्रानुसार घरातील प्रत्येक भाग महत्त्वपूर्ण आहे. घरातील एखाद्या भागात वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कुटुंबातील सर्व सदस्यांवर पडतो. यामुळे घर बांधण्यापूर्वी वास्तू विशेषज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार किचनमध्ये वास्तुदोष असल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव कुटुंबातील महिलांवर जास्त प्रमाणात पडतो. कारण महिला बहुतांश वेळ किचनमध्ये असतात. यामुळे किचन बांधताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.


  1. किचनमध्ये काळ्या रंगाचे ग्रॅनाईट वापरू नये. याचा नकारात्मक प्रभाव कुटुंबातील महिलांवर पडतो.


  2. किचन घराच्या मध्यभागी नाही तर कोपऱ्यात असावे.


  3. किचनमध्ये थोडीशी उघडी जागाही असावी, ज्यामुळे किचनमधील धूर, गॅस, उष्णता सहजपणे बाहेर निघू शकेल.


  4. वास्तू शास्त्रानुसार ईशान्य दिशा सोडून किचन इतर कोणत्याही दिशेला बांधू शकता.


  5. किचनच्या पूर्व दिशेला खिडकी अवश्य असावी. यामुळे सकाळचा सूर्यप्रकाश घरात येईल आणि याचा कुटुंबाच्या आरोग्यावर चांगला प्रभाव पडेल.


  6. किचनला चिटकूनच टॉयलेट किंवा बाथरूम नसावे. किचन आणि बाथरूमचे दरवाजेही समोरासमोर नसावेत. अन्यथा नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.


  7. जिन्याखाली किचन असू नये.

Trending