Home | National | Delhi | The army's trio will fight against the battle of Vajra

सैन्याची त्रिदल वज्रमूठ युद्ध संयुक्त लढणार; आधुनिकीकरणाचा आराखडा तयार

मुकेश कौशिक | Update - Apr 14, 2019, 11:16 AM IST

पुलवामा हल्ला, बालाकोट हवाई कारवाईनंतर पहिल्यांदाच सैन्य कमांडर यांच्या परिषदेत या प्रस्तावावर सहमती

  • The army's trio will fight against the battle of Vajra

    नवी दिल्ली - देशातील सैन्याच्या तीन दलांनी भविष्यातील रणनीतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे त्रिदल संयुक्त रणनीतीद्वारे युद्ध लढतील. पुलवामा हल्ला, बालाकोट हवाई कारवाईनंतर पहिल्यांदाच सैन्य कमांडर यांच्या परिषदेत या प्रस्तावावर सहमती झाली आहे.


    पाच दिवस चाललेल्या परिषदेत तीनही दल यापुढे रिअल टाईम नुसार गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण करण्यावरही सहमत झाले आहेत. शत्रूच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी संयुक्त रणनीति स्वीकारली जाईल. हवाई दलाचे प्रमुख बी.एस. धनाेआ व नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी देखील तीनही दलांच्या संयुक्त कारवाईवर जोर दिला.सूत्रांच्या मते, ऑपरेशनल तयारीच्यादृष्टीने सैन्य कमांडरांनी सीमेवर दहशतवाद्यांना मिळणारी रसद व इतर उपद्रवाचा सामना करण्यासाठी आवश्यक रणनीतिवर देखील चर्चा करण्यात आली. घुसखोरी रोखण्यासाठी व्यवस्था, दहशतवाद्यांची भरती व दहशतवादी कारवायांच्या पद्धतींवर देखील उच्च स्तरीय चर्चा झाली. उत्तर तसेच पूर्वेकडील भागात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी रणनीति तयार करण्यावरही चर्चा झाली. सीमा क्षेत्रात रस्ते बनवण्याच्या कामावर निगराणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

    आधुनिकीकरणाचा आराखडा तयार
    सैन्य परिषदेत प्रामुख्याने तीनही दलांच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात आला होता. शस्त्रसज्जेसाठी आवश्यक खरेदीला प्राधान्य देण्याचा मुद्दाही चर्चिला गेला. यात डिजिटल उपकरणांची खरेदीस प्राधान्यक्रम दिला आहे. सैन्याचा बहुतांश निधी वेतन व देखभालीवर खर्च होतो. त्याचा परिणाम शस्त्र खरेदीवर होतो. सैन्याच्या गेल्या दोन परिषदांत अनावश्यक विभाग बंद करण्याची चर्चा झाली. खर्च ६० टक्क्यांवर आणण्याचे आव्हान आहे. सध्या तो ८३ टक्के आहे. त्यामुळे आधुनिकीकरणासाठी १७ टक्के निधी द्यावा लागतो. या अर्थसंकल्पात १.५३ लाख कोटी रुपये दैनंदिन खर्च-वेतनावर खर्चाची तरतूद आहे.

Trending