आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Arrest Of The BSP Leader Who Crack The MBA Question Paper For The Girl Friend

मैत्रिणीसाठी एमबीएची प्रश्नपत्रिका फाेडणाऱ्या बसपा नेत्यास अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिगड - उत्तर प्रदेशात  बसपा नेत्यास अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा एमबीएचा पेपर फोडण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली आहे. त्याने विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मैत्रिणीसाठी एमबीएचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केला होता. बसपा नेत्याच्या अटकेनंतर त्याची मैत्रीण फरार झाली आहे.  


आरोपीचे नाव फिरोज आलम ऊर्फ राजा आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात सांगितले, त्याची मैत्रीण विद्यापीठात एमबीए शिकते आहे. आलम याने या कामासाठी विद्यापीठातील कर्मचारी इर्शाद याची मदत घेतली होती. त्याच्या बदल्यात आलम याने इर्शादला विद्यापीठात कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. अलिगडचे एसएसपी आकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी ज्या फ्लॅटवर भेटत हाेते तो सील करण्यात आला आहे. 


हा फ्लॅट हैदर याचा काका तहसीम सिद्दिकी यांचा आहे. सिद्दिकी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. एसएसपी म्हणाले, ही टोळी २ हजार रुपयात उत्तरपत्रिका विकत होती. प्रवेश परीक्षेसाठी त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता.