आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Article By Navneet Gurjar, 'Don't Make Noise In The City,price's Eyes Are Coming...'

शहर में शोर मत करना, शहज़ादे की आंखें आई हैं...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनीत गुर्जर खरे आहे, फाळणीच्या वेदना सांगता येत नाहीत. तिकडून इकडे परतणारे लोक शरणार्थ्यांच्या शिबिरात संपूर्ण कुटुंबासोबत झोपायचे आणि सकाळी पाहिले तर त्यांच्या महिला, मुली गायब झालेल्या असायच्या. जे घरात असतील, त्या सगळ्यांना मारुन टाकले जायचे आणि त्यांच्या घरादारासह शेतीवाडी व महिलांवर कब्जा केला जायचा. त्यांच्या डोक्यावरचा सूर्य धूर ओकत होता, सावल्यांनीही शरीराची साथ सोडली होती. घरे स्वत:चाच पत्ता विचारत होती. अंथरुणावर भयाण शांतता पहुडली होती... आणि चेहरा तसा राहिला नव्हताच, त्याचा नुसता आभास उरलेला... नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात अशा वेदना भोगणाऱ्यांचा विचार केला गेला, ही सर्वांत चांगली गोष्ट. कारण, एखादा हिंदू किंवा शीख कुठेही, कुठल्याही देशातून हताश होऊन अखेर कुठे जाऊ शकतो? उघड आहे, तो भारतातच येईल! तर त्याला इथे नागरिकत्व का मिळू नये? मिळालेच पाहिजे. बाकी लोकांसाठी तर अन्य देश असू शकतात, जिथे ते जाऊ शकतात. पण, आज जेव्हा आम्ही कायद्याचे राज्य स्थापित करु शकत नाही, महिलांवरील अत्याचार आणि तशा प्रकारचे अन्य गुन्हे रोखू शकत नाही, तेव्हा अचानक, घाई गडबडीत हे विधेयक अाणण्याचे कारण काय? पुन्हा त्या विधेयकात नागरिकत्वासाठी ३१ डिसेंबर २०१४ ची कालमर्यादा टाकण्याचा अर्थ काय? एखादी पीडित व्यक्ती किंवा परिवार त्यानंतर भारतात येऊ शकत नाही? या मर्यादेनंतर तो हिंदू, हिंदू राहणार नाही की तो शीख, शीख राहणार नाही? की या कालामर्यादेनंतर त्यांची वेदना संपून जाईल?सगळ्यांना आठवत असेल, स्वयंपाकघरांमध्ये आजीचे राज्य होते, तेव्हा आपण मुले सगळ्यात पहिले बंड त्याविरुद्ध करायचो. आपण पाहिलेय, की घरासमोरच्या छपरावर दोन-तीन घाण, तुटके-फुटके ग्लास पडलेले असायचे. मुलांनी आणि समाजातील नव्या विचारांनी आता हे ग्लास फोडून टाकले आहेत. ती छपरेही आता गायब झाली आहेत. अशा वातावरणात, या काळात पुन्हा आमचे सरकार तोच हिंदू- मुस्लिमचा गोंगाट का करते आहे? हिंदू, मुस्लिम, पारशी लोकांवर अन्य देशात अन्याय झाला असेल आणि तुम्ही त्यांना भारताचे नागरिकत्व देऊन, इथे सन्मान देऊन विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहात, हे ठीक. पण, अशा सगळ्या गोष्टींची पद्धत नेहमी अशीच का असते? विस्तृत चर्चा, संवाद किंवा विचारांच्या देवाणघेवाणीनंतर त्या का येत नाहीत? हे सरकार नेहमी घाईत का असते? पूर्ण बहुमत असूनही या सरकारला कुणाचे ऐकून घ्यावे, असे का वाटत नाही?

विरोधी पक्षांना हल्ला करण्याची संधी देऊन केवळ हिंदू- मुस्लिम भावनेला अधिक भडकावणे आणि भडकावत ठेवणे, हाच मुख्य उद्देश असेल, तर तसे खुलेपणे सांगत का नाहीत? म्हणजे तुम्हाला जे करायचे आहे, तेच योग्य आहे. कुणाला काही बोलण्याचा अधिकारच नाही. अशा स्थितीत एक शेर आठवतो.. 'शहर में शोर मत करना, शहज़ादे की आंखे आयी है।'

नवनीत गुर्जर, नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर
 

बातम्या आणखी आहेत...