आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मादी बिबट्यावर विषप्रयाेग करून हत्या करणारा अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - कंधाणे शिवारात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या बिबट्यावर विषप्रयाेग करण्यात अाल्याचे तपासात उघड झाले अाहे. वासरू मारल्यानंतर त्याचे मांस खाण्यासाठी बिबट्या येणार हे जाणून त्यावर विष टाकून बिबट्याला ठार करणाऱ्या संशयितास वनविभागाने अटक केली अाहे. विक्रम रामदास थाेरेकर त्याचे नाव असून, त्याला ३० नाेव्हेंबरपर्यंत न्यायालयीन काेठडी ठाेठावली.
धनदाईदेवी मंदिराजवळ नाल्यात शनिवारी मादी बिबट्या बेशुद्धावस्थेत अाढळली हाेती.

 

वन कर्मचाऱ्यांनी नेट जाळीच्या सहाय्याने बिबट्याला पकडून लाेणवाडे उद्यानात अाणले हाेते. मात्र, तपासणीअंती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्या मृत झाल्याचे सांगितले.

शवविच्छेदनात बिबट्यावर विषप्रयाेग झाल्याचे निदर्शनास अाले. या प्रकरणी वनअधिकाऱ्यांनी विक्रम थाेरेकरला ताब्यात घेतले हाेते.

बातम्या आणखी आहेत...