आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Audience Was Disappointed To See 'Sahoo' As They Expected Sound Of 'Baahubali'

'बाहुबली' चित्रपटातील आवाज आणि प्रभास याने प्रभावित होऊन 'साहो' पाहण्यासाठी गेले प्रेक्षक, म्हणून झाले निराश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी हिंदी बोलण्यासाठी पूर्ण मेहनत केली - प्रभास...

बॉलिवूड डेस्क : 'बाहुबली' फेम प्रभासचा मेगाबजेट चित्रपट 'साहो' अपेक्षेपेक्षा कमी कमाईमुळे चर्चेत आहे. चित्रपटाची माउथ पब्लिसिटीदेखील खूप खराब आहे. विशेषतः प्रभासचा हिंदी अॅक्सेंट निंदकांच्या निशाण्यावर आहे. सांगितले जात आहे की, प्रेक्षक 'बाहुबली' मध्ये त्याचा डब झालेला आवाजच डोक्यात घेऊन गेले आणि 'साहो' पाहू लागले. त्याच्या अॅक्सेंटचीच खूप निंदा होत आहे आणि त्यामुळे त्याच्या डिफेंससाठी आता शरद केळकर आणि कमाल अहमद समोर आले आहेत. शरदने 'बाहुबली' मध्ये प्रभासचा आवाज डब केला होता. तर कमाल अहमद 'साहो' मध्ये प्रभासचा डिक्शन कोच होता. 
 

मी हिंदी बोलण्यासाठी पूर्ण मेहनत केली - प्रभास... 
प्रभास म्हणतो, "मी हिंदीवर पूर्ण मेहनत केली. हिंदी शिकणे खूप कठीण नव्हते, पण हे सत्य आहे की, हिंदी माझी फर्स्ट लँग्वेज नहिये. मी हिंदी लिहू आणि वाचू शकतो. पण आम्ही घरात हिंदीमध्ये बोलत नाही. शूटला जाण्यापूर्वी मी खूप होमवर्क केला होता. डायलॉग क्लासेसदेखील कंडक्ट करून घेतले होते. पहिल्या शेड्यूलमध्ये तर आव्हाने आली, पण दुसऱ्या शेड्यूलपासून गोष्टी सोप्या होऊ लागल्या. सेटवर डायलेक्ट कोच सोबत राहायचे. त्यांनी अनेक बारीकसे शिकवले. आशा आहे की, भविष्यात माझे हिंदीचे उच्चार आणखी स्मूथ होत जातील.' 
 

शरद केळकर म्हणाला - मनात बसलेला आहे 'बाहुबली' चा आवाज... 
मी चित्रपट तर पहिला नाहीये पण ट्रेलरमध्ये त्याचा आवाज ऐकला आहे. त्यावरून मी त्यांना जज करू शकत नाही. मला वाटते हा चित्रपट पाहायला जातं लोक डोक्यात प्रभासचा तोच आवाज घेऊन गेले असतील जो त्यांनी 'बाहुबली' मध्ये ऐकला होता. त्यांच्या डोक्या प्रभासच नव्हे तर माझा बसला आहे. अशात जेव्हा 'साहो' मध्ये लोकांनी प्रभासच खरा आवाज ऐकला तेव्हा तो त्यांना खटकला. जुन्या काळातही जेव्हा अभिनेत्री डबिंग आर्टिस्टशिवाय आपल्या आवाजासोबत यायच्या तेव्हा लोकांना विचित्र वाटायचे. हे साहजिक आहे. मलाही थोडे वेगळे वाटले पण तितके नाही. कारण मी पर्सनली त्याला ओळखतो. मला माहित आहे की, तो याचा अॅक्सेंटमध्ये बोलतो. प्रभासला आणखी थोडी मेहनत करावी लागेल. 
 

कमाल अहमद म्हणाला - मातृभाषेचा प्रभाव तर दिसतोच... 
प्रभास बालपणापासून तेलंगणामध्ये राहिला आहे. त्यामुळे हिंदीच्या अॅक्सेंटमध्ये तेथील मातृभाषेचा प्रभाव तर दिसणारच होता. आतापर्यंत साउथच्या अभिनेत्री जसे की, हेमा मालिनी यांच्याही आवाजात तो टोन येतोच. त्या एवढ्या दिवसांपासून काम करत आहेत त्यामुळे आता प्रेक्षकांना ते सवयीचे झाले आहे. मराठीमध्ये नेजल अॅक्सेंट नसतो ते 'हैं' नाही बोलत. तर ते 'है' म्हणतात. तसेच तेलंगणातील लोक 'ह' चा उच्चार कमी करतात. प्रभास मेहनती आहे आणि तो लवकरच आपल्या अॅक्सेंटमधील उणीवा दूर करेल. 
 

का होत आहे निंदा... 
डायलॉग डिलिव्हरीदरम्यान प्रभासच्या साउथ इंडियन अॅक्सेंटचा त्याच्या हिंदीवर प्रभाव दिसत होता.  
यासोबतच डायलॉग बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन संवादाशी मिसमॅच होत होते.  
 

मार्केटिंग स्ट्रॅटेजी झाली बॅकफायर... 
प्रभासच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, 'साहो' मध्ये त्याला हिंदीमध्ये यासाठी बोलायला लावले जेणेकरून त्याच्या ओरिजिनल आवाजासोबत त्याला बॉलिवूडमध्ये स्थापित केले जाऊ शकेल. तसेच म्हणले जात आहे की, मार्केटिंगसाठी रिलीजच्या पूर्वी ही चर्चा व्हायला नको होती की, चित्रपटात प्रभासचा ओरिजनल आवाज आहे. ही स्ट्रॅटेजी बॅकफायर झाली. याबद्दल गुप्तता बाळगली असती तर आता एवढा गोंधळ झाला नसता.  

बातम्या आणखी आहेत...