The Ban On The Tic Tac App Was Lifted By Madras High Court
टिक-टाॅक पुन्हा सुरू होणार; मद्रास हायकोर्टाने अॅपवरील बंदी उठवली, अश्लील सामग्री काढण्याचे निर्देश
3 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
चेन्नई - तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या टिक-टॉक या अॅपवरील बंदी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने उठवली. अश्लील सामग्री या अॅपवर वापरली जात असल्याचा आरोप करून यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका अॅड. मुथुकुमार यांनी दाखल केली होती. यावर हायकोर्टाने ३ एप्रिल रोजी या अॅपवर बंदी घालण्याचे निर्देश सरकारला दिले होते. शिवाय अॅपवर तात्पुरती बंदी घातली होती. दरम्यान, ही बंदी उठवताना हायकोर्टाने काही अटी घातल्या आहेत. या अॅपवर कोणत्याही परिस्थितीत अश्लील सामग्री अपलोड केली जाऊ नये, असे हायकोर्टाने म्हटले आहे. बंदी उठवल्यानंतर जर अशी सामग्री अॅपवर आढळली तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटल्यास सामोरे जावे लागेल, असे हायकोर्टाने सुनावले. टिक-टॉक या अॅपची मालकी चिनी कंपनी बाइट डान्स या कंपनीकडे आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारच्या आदेशानुसार १८ एप्रिलपासून अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप ब्लॉक करण्यात आले होते. या बंदीमुळे दिवसाला साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान होत असून २५० नोकऱ्या धोक्यात असल्याचा युक्तिवाद चिनी कंपनीने केला होता.