आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Banana Art Which Was Sold For 85 Lac Rupees, Was Eaten By The Artist, The Complaint Lodged Against Him

भिंतीवर लावलेल्या केळाची किंमत तब्बल 85 लाख रुपये, व्यक्तीने खाल्यामुळे दाखल झाली तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इटलीच्या प्रसिद्ध मॉरिजियो कॅटेलनची कलाकारी

मियामी : अमेरिकेमध्ये मियामीतील एका आर्ट गॅलरीमध्ये डक्ट टेप चिटकवलेल्या केळीचे आर्ट 85 लाख रुपयांमध्ये विकले गेले. जे एग्जीबिशनदरम्यान रविवारी अमेरिकेचा आर्टिस्ट डेव्हिड डाटुनाने भिंतीवरून काढून खाऊन घेतले. असे केल्यामुळे गॅलरीच्या डायरेक्टर लूसियन टेरेसने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 


या घटनेच्या 15 मिनिटानंतर एक नवी केळी आणून तिथे लावली गेली. हे आर्ट इटलीचा आर्टिस्ट मॉंरिजियोने बनवले होते. त्याने अद्याप अशा तीन कलाकृती बनवल्या आहेत. यातील दोन विकल्या गेल्या आहेत. शेवटची विकण्यासाठी ठेवली गेली आहे. आता याचे फोटो व्हायरल होत आहेत. 

या कलाकृतीसोबत याच्या विश्वसनीयतेचे एक सर्टिफिकेटदेखील होते... 


या कलाकृतीमध्ये वापरली गेलेली केळी मियामीच्या एका ग्रोसरी स्‍टोअरमधून खरेदी केली होती. यामध्ये डक्‍ट टेपचा एक तुकडादेखील लावला गेला आहे. यासोबत याच्या विश्वसनीयतेचे एक सर्टिफिकेटदेखील आहे. मात्र हे सांगितले गेलेले नाही की, केळी किती दिवसानंतर साडू लागेल. पॅरोटिन गॅलरीचा मालक इमॅनुअल पॅरोटिनने मीडियाला सांगितले, "केळी वैश्विक व्यापार आणि ह्यूमरचे प्रतीक आहे. याला "कॉमेडियन" नाव दिले गेले आहे." मॉंरिजियो कॅटेलन तोच कलाकार आहे, ज्याने बनवलेले सोन्याचे टॉयलेट (18 कॅरेट) काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत होते. 

बातम्या आणखी आहेत...