आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोएडा - निवृत्त ब्रिगेडियरचे डेबिट कार्ड अचानक ब्लॉक केल्याने जिल्हा ग्राहक मंचाने बँकेला दोन लाख रुपये दंड ठोठावला. निवृत्त ब्रिगेडियर पत्नीसह श्रीनगरला गेले होते. त्यांना कार्ड ब्लॉक झाल्याची माहिती नव्हती. ते तेथील हॉटेलमध्ये काही दिवस थांबले होते. त्यांनी खाण्यापिण्याचे बिल देण्यासाठी आपले डेबिट कार्ड दिले. तेव्हा ते ब्लॉक असल्याचे कळले. त्यामुळे त्यांना व त्यांच्या पत्नीस खूप मनस्ताप सोसावा लागला. या प्रकरणी ग्रेटर नोएडा येथील जिल्हा ग्राहक मंचाचे न्यायाधीश राजेंद्रबाबू शर्मा यांनी टिप्पणीत म्हटले, देशसेवेसाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या व आयुष्य वाहिलेल्या लष्करी अधिकाऱ्यांचा सन्मान करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांचा अवमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही.
जून २०१६ मध्ये सपत्नीक श्रीनगरला गेलेले हाेते
नोएडा सेक्टर - ४९ मध्ये राहणारे निवृत्त ब्रिगेडियर सी. के. पाठक (७५) बांगलादेश, श्रीलंका व जम्मू-काश्मीरमध्ये सेवेत होते. ३५ वर्षे लष्करात सेवा बजावल्यानंतर निवृत्त झाले. ते नोएडामध्ये वास्तव्यास होते. त्यांचे सेक्टर-१८ मधील सिंडिकेट बँकेत पेन्शन खाते आहे. या बँकेचे डेबिट कार्ड त्यांच्याजवळ होते. पत्नीसह ९ जून २०१६ रोजी ते श्रीनगरला गेेले होते. त्यांच्याकडील रोख रक्कम तेथे फिरण्यात खर्च झाली. ते हॉटेलमध्ये ७ दिवस थांबलेले होते. तेथेच त्यांनी जेवणही घेतले होते. हे बिल त्यांना डेबिट कार्डाने द्यायचे होते. पण कार्ड अचानक ब्लॉक झाल्याचा संदेश आला. त्यामुळे त्यांना हॉटेल सोडता येईना आणि बाहेरही कोठे जाता येत नव्हते, अशी बिकट अवस्था झाली.
मित्रांनी दिली रक्कम
ब्रिगेडियरना खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्यांनी काही मित्रांना बोलावून हॉटेलची रक्कम दिली. नंतर १६ जून २०१६ रोजी हॉटेल सोडले. मानसिक छळ व अवमानना झेलावी लागल्याने त्यांनी बँकेविरोधात ग्राहक मंचात तक्रार दिली. मंचाने त्यांचा गौरव करत बँकेस दंड ठोठावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.