आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Beggar Received Rs 6.37 Crore In The Bank Account Of The Woman, Begging For 10 Years

भिकारी महिलेच्या बँक अकाउंटमध्ये मिळाले 6.37 कोटी रुपए, 10 वर्षांपासून मागत होती भीक 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेरुत : लेबनानमध्ये एक महिला भिकारी सध्या चर्चेत आहे, कारण तिच्या बँक अकाउंटमध्ये 6.37 कोटी रुपये असल्याचा खुलासा झाला. भिकारीण वाफा मोहम्मद अवदने हे पैसे भीक मागून जमवले आहेत. 

मीडिया रिपोर्ट्स नुसार, हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा वाफा मोहम्मद अवद आपले सेविंग्स एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रांसफर करण्यासाठी पोहोचली होती. जेव्हा तिने पैसे ट्रांसफर करण्यासाठी निवेदन दिले तेव्हा तेव्हा बँकेमध्ये नगदीची समस्या निर्माण झाली. अवदचे दोन चेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर 30 सप्टेंबर 2019 ही तारीख नामूदकेलेली आहे. 

सीदोनच्या हॉस्पिटलबाहेर भीक मागते ही भिकारीण... 
वाफा सीदोन शहरातील राहणारी आहे आणि तिथे येथील एका प्रसिद्ध हॉस्पिटलसमोर ती दिवसभर भीक मागते. हॉस्पिटलमधील एक नर्स हाना एसने गल्फ न्यूजला सांगितले की, वाफाला आम्ही भिकारीण म्हणून ओळखतो. जास्तीत जास्त वेळ ती हॉस्पिटलच्या गेटच्याबाहेर भीक मागताना दिसते. आसपासचे राहणारे जास्तीत जास्त लोक तिला ओळखतात. ती इथे मागील 10 वर्षांपासून भीक मागत आहे. 

बातम्या आणखी आहेत...